Join us  

जागतिक मधमाशी दिन : ‘अमृत’ निर्माण करणाऱ्या कीटकाचे अस्तित्व धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 2:19 AM

मधासाठी पोळी जाळणे, विषारी कीटक नाशके फवारणे, मोबाईल टॉवर उभारणे, मधमाशांविषयीचे अज्ञान पसरवणे या सर्व कारणांमुळे एक उपयुक्त जीव संपण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

- सचिन लुंगसेमुंबई : मधमाशीला सामाजिक किटक म्हटले जाते. सपुष्प वनस्पतींना मधमाशीचा होणारा स्पर्श परिस स्पर्शापेक्षा कमी नसतो. तर फलधारणेसाठी अत्यंत उपयुक्त असतो. माणसाला अन्न वनस्पतीपासून मिळत असले तरीही मधमाशा यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच आपल्या सर्वांवर मधमाशीचे मोठे उपकार आहेत. मधासारखे अमृत निर्माण करणाºया या किटकाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.मधासाठी पोळी जाळणे, विषारी कीटक नाशके फवारणे, मोबाईल टॉवर उभारणे, मधमाशांविषयीचे अज्ञान पसरवणे या सर्व कारणांमुळे एक उपयुक्त जीव संपण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.पराग सिंचनामुळे शेती उत्पादनात वाढ होत असल्याने मध व मेण या बाबींपेक्षा उत्पादनातील वाढ हा महत्त्वाचा घटक मानून मधमाशांच्या पालनाला अग्रक्रम देणे महत्त्वाचे आहे. रोजगार निर्मितीला वाव असल्याने हा पूरक उद्योग म्हणून केल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो.फळे, भाजीपाला पिकांच्या परागीकरणात मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे उत्पादनात २५ ते ३५ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ होते. मधमाशी पालनाकडे पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांचा कल वाढवण्याकरिता शासनातर्फे अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यातील काही योजनांना अनुदानसुद्धा दिले जाते; याची मदत घ्यावी, असे आवाहन केले जात असल्याची माहिती खादी ग्रामोद्योग मुंबई येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी दिली.मधमाशी ही आपल्यासाठ अतिशय महत्त्वाचे काम करते. समूहाने जगत आदर्श जगणे माणसाला शिकवते. दीर्घ कष्ट करत मधासारखा गोड पदार्थ निर्माण करते. आपण सर्व मधमाशी वाचवण्याचा पयार्याने, माणूस वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू या, असेही आवाहन केले जात आहे.संयुक्त राष्टÑसंघाचा ठरावसंयुक्त राष्ट्रसंघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार २० मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून जाहीर झाला. मधमाशांचे संवर्धन करण्यासह किटकांचे संवर्धन करण्यासाठी याबाबत सातत्याने जनजागृती केली जाते.मधमाशांच्या प्रजाती : या मधमाशांपैकी भारतीय माशी आणि युरोपियन माशी पेटीत पाळता येतात.१) भारतीय माशी (अ‍ॅपिस सेरेना इंडिका). २) युरोपियन माशी (अ‍ॅपिस मेलिपेरा) ३) आग्या माशी (अ‍ॅपिस डॉरसेटा) ४) लहान माशी (अ‍ॅपिस फ्लोरिआ)

टॅग्स :मुंबई