Join us

महामार्गावरील कामे अद्याप अपूर्णच

By admin | Updated: January 7, 2015 00:26 IST

पनवेल महामार्गावरील खारघर टोलनाका शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सुरू केला आहे. परंतु महामार्गावर अनेक ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत आहेत.

वैभव गायकर - नवी मुंबईसायन - पनवेल महामार्गावरील खारघर टोलनाका शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सुरू केला आहे. परंतु महामार्गावर अनेक ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत आहेत. रखडलेल्या कामांमुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.शासनाने बाराशे कोटी रुपये खर्च करून २३ किलोमीटर सायन-पनवेल मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. काम पूर्ण होईपर्यंत हा खर्च १७०० कोटींवर गेल्याचे बोलले जात आहे.रुंदीकरणाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले असल्यामुळे टोलनाका सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर तत्काळ टोल सुरू केला आहे. नागरिकांवर टोलचा भुर्दंड पडला आहेच त्याचबरोबर अर्धवट कामांमुळेही त्रास वाढत आहे. या मार्गावर सात उड्डाणपूल बांधण्यात येणार होते. त्यापैकी पाच उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. परंतु पुलाखालील कामे अद्याप अर्धवट आहेत. कामोठे, कळंबोली, तळोजा लिंकरोडजवळ , खारघर हिरानंदानी बसस्थानक, उरणफाटा, नेरुळ, तुर्भे, सानपाडा उड्डाणपुलाखालील रस्ता अर्धवट आहेत. यामुळे अनेक ठिकाणी अपघात देखील झाले आहेत . विशेष म्हणजे या रुंदीकरणात मानखुर्द रेल्वे क्रॉसिंग आणि तुर्भे रेल्वे क्रॉसिंगसाठी बांधण्यात येणारे पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही . तळोजा लिंक रोडजवळील पुरुषार्थ पेट्रोलपंपासमोरील मार्गावर काँक्रीटीकरणाचे काम अर्धवट असल्यामुळे वाहनचालकांना रस्त्यांतून मार्ग काढत जावे लागत आहे. कोपरा खाडीजवळील सुरक्षा कठड्याचे कामही पूर्ण झालेले नाही. हीच अवस्था कळंबोली, कामोठे उड्डाणपुलाजवळील रस्त्यांलगत असल्यामुळे वाहतूक कोंडीत वाढहोत आहे. पनवेलच्या दिशेने सायनकडे येणाऱ्या खारघर, नेरुळ, सानपाडा याठिकाणी देखील हीच अवस्था आहे. रुंदीकरणाचे काम ९८ टक्के पूर्ण झाले असले तरी उर्वरित २ टक्क्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. याशिवाय अर्धवट काम असताना टोल सुरू केल्याविषयीही नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण होत आहे.भुयारी मार्गाचे काम रखडलेच्खारघर हिरानंदानीजवळ भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. सदर काम रखडले असून यापूर्वी सदर ठिकाणी अपघातही झाले आहेत. सद्यस्थितीमध्ये भुयारी मार्गासाठी खोदकाम करून काँक्रीटीकरण सुरू केले आहे. यामुळे येथे वाहतूक कोंडी होत आहे. कोपरावासीयांची गैरसोयच्कोपरा गावाजवळ दोन्ही बाजूचे रस्ते खोदून ठेवले आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. येथील काँक्रीटीकरण लवकर पूर्ण करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.