Join us

श्रीबागमध्ये एकवटले विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते

By admin | Updated: February 14, 2015 22:31 IST

विश्व हिंदू परिषदचे काम जगभरातील ३० देशांत सुरु असून, कार्यकर्त्यांनी समाजातील सर्वस्तरांत पोहोचून जास्तीतजास्त लोकांना परिषदेच्या कार्याशी जोडणे आवश्यक आहे.

अलिबाग : विश्व हिंदू परिषदचे काम जगभरातील ३० देशांत सुरु असून, कार्यकर्त्यांनी समाजातील सर्वस्तरांत पोहोचून जास्तीतजास्त लोकांना परिषदेच्या कार्याशी जोडणे आवश्यक आहे. परिषदेकडे समाज आशेने पाहत आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सहसत्संग प्रमुख दादा वेदक यांनी शनिवारी येथे केले आहे.शहरातील श्रीबागमधील कच्छी भवन सभागृहात विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांत व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. २०० स्वयंसेवकांच्या या दोन दिवसांच्या या बैठकीचे उद्घाटन दीपप्रज्वलित करून वेदक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त सचिव प्रा. व्यंकटेश आपदेव, कोकण प्रांत अध्यक्ष देवकीनंदन जिंदल, कोकण प्रांत मंत्री अ‍ॅड.दीपक गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.कोकण प्रांतामध्ये मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या क्षेत्राचा समावेश होतो. विहिंप सुवर्ण जयंती वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमांचा आढावा, संघटनेचा विस्तार व आगामी कार्यरूपरेषा हे विषय बैठकीसमोर आहेत. (विशेष प्रतिनिधी)