Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रमजीवींचा मोर्चा

By admin | Updated: November 24, 2014 23:06 IST

देशाच्या आर्थिक राजधानीनजीक असलेला पालघर जिल्हा अत्यंत दुर्गम आणि सर्व मुलभूत सुविधांपासून वंचित आहे.

पालघर : देशाच्या आर्थिक राजधानीनजीक असलेला पालघर जिल्हा अत्यंत दुर्गम आणि सर्व मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. आरोग्य सुविधांची वानवा व कुपोषणाने हजारो बालकांचे बळी जात आहेत. खायला दाणा नाही आणि हाताला काम नाही अशा दुहेरी संकटात सापडलेल्या आदिवासी बांधवांच्या बाबत शासन उदासीन असल्याचा आरोप o्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडीत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर नेलेल्या मोर्चासमोर बोलताना केला.
पालघरच्या चाररस्त्यापासून निघालेल्या 8 ते 1क् हजार मोर्चेक:यांनी शासन विरोधी घोषणा देत 2क्क्क् सालापूर्वीच्या शासकीय जागेवरील झोपडय़ांना नियमानुसार करणो, वनजमीनीवरील अपात्र ठरविण्यात आलेले दावे मंजूर करणो, किमान 15क् दिवसांचे नियमीत काम देणो, स्थानिकाना नोकरीत प्राधान्या देणो, धरणाचे पाणी प्राधान्याने शेतीला द्यावे, पिंजाळ आणि सुसरी धरणग्रस्तांचे पुनर्वसन करणो, वाडा ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांची रिक्तपदे त्वरीत भरणो, जिर्ण झालेले वीजेचे पोल त्वरीत बदलून देणो, फुदगी समाजाला जातीचे दाखले मिळवून देणो इ. मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांना देण्यात आले. 
राजकारण्यांच्या हातात झाडु देऊन दररोज वृत्तपत्रत फोटो प्रसिद्ध केले जात असताना आदिवासी भागातील आo्रमशाळात शौचालयेच नाहीत, असे  वास्तव पंडीत यांनी सर्वासमोर मांडले. देशात मागेल त्याला काम देण्याचे शासनाने धोरण जाहीर केले असले तरी पालघर जिल्हयातील अनेक भागात रोजगाराची मागणी करूनही रोजगार उपलब्ध करून दिला जात नाही. त्यामुळे भूमीपुत्रंवर स्थलांतरणाची पाळी ओढावत असेल तर रोजगार हमीचा 
कायदा काय कामाचा असा उपरोधीक 
प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  
(वार्ताहर)
 
पालघर हा नव्याने निर्माण झालेला जिल्हा आजही अत्यंत दुर्गम आणि सर्वच मुलभूत सुविधांच्या बाबतीत मागासलेला असुन आदिवासी भागाचा आजही आरोग्यात्मक तसेच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक  विकास झालेला नाही. 
 
हजारो बालके भुकबळीची शिकार होत असून आरोग्य केंद्रातील डॉक्टर रुग्णालयात राहत नसल्याने रुग्णमृत्यूच्या घटनामध्ये वाढ होत आहे. 
 
वाडा, विक्रमगड, मोखाडा, जव्हार, डहाणू, तलासरी इ. भागातील हजारो आदिवासींच्या हातांना रोहयो अंतर्गत कामे नसल्याने रोजगारासाठी त्यांना विटभट्टी, बांधकाम, रेती व्यवसायात मजुरीसाठी स्थलांतरीत व्हावे लागते. 
 
यावेळी त्यांच्या मुलांच्या शिक्षणांची आबाळ होऊन अल्पवयीन मुलींवर लैंगीक अत्याचाराचे दुर्दैवी प्रकार घडत असल्याचे विवेक पंडीत यांनी सांगितले.