Join us

कंपनीतील कामगाराची बोटे तुटली

By admin | Updated: June 13, 2014 00:57 IST

महाड औद्योगिक वसाहतीमधील टाइम्स टेक्नोप्लास प्रा.लि.मध्ये अपघात होऊन एका कामगाराची बोटे तुटली असल्याची घटना घडली आहे

बिरवाडी : महाड औद्योगिक वसाहतीमधील टाइम्स टेक्नोप्लास प्रा.लि.मध्ये अपघात होऊन एका कामगाराची बोटे तुटली असल्याची घटना घडली आहे.टाइम्स टेक्नोप्लास प्रा.लि.चे व्यवस्थापक यांनी महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात माहिती दिली असून देशमुख यांच्या सुधाकर एंटरप्रायझेसमध्ये अनिल यादव रा.बिरवाडी हा कामगार ठेका पध्दतीवर कंपनीमध्ये कार्यरत आहे. डायमध्ये बोटे सापडल्याने त्याच्या डाव्या हाताची बोटे तुटली असून त्याला उपचाराकरीता महाड रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कामातील दुर्लक्षामुळे दुखापत झाल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. टाइम्स टेक्नोप्लास प्रा.लि. मध्ये दोनशे ते पाचशे लिटरपर्यंतचे प्लॅस्टिकचे ड्रम तयार केले जातात या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. (वार्ताहर)