Join us  

वैद्यकीय सेवा खासगीकरणाच्या प्रक्रियेविरुद्ध कामगार आक्रमक, आजपासून तीन दिवस काम बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 6:00 AM

आजपासून तीन दिवस काम बंद : सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेद्वारे निषेध

मुंबई : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये चतुर्थ श्रेणी सेवांचे खासगीकरण करण्याबाबत स्वीकारलेल्या धोरणाच्या निषेधार्थ मुंबई परिसरातील पाच व उर्वरित राज्यातील २७ रुग्णालयांत ११ ते १३ जून या कालावधीत तीन दिवस काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

शासकीय रुग्णालयांतील या काम बंद आंदोलनाचा रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण संचालक, सर्व अधिष्ठाता यांना नोटीस पाठवून आंदोलनाचा इशारा दिला. परंतु त्याच्यावर कुठलीच कार्यवाही न झाल्यामुळे अख्ोर हा निर्णय घेण्यात आला. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सेवा खासगी कंत्राटदारांना देण्यासाठी शासनाने वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली आहे. निविदा मागविल्या असून लवकरच त्यानुसार कार्यवाही होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे भवितव्य संपुष्टात आल्याची भीती संघटनेने व्यक्त केली.शासनाच्या निर्णयामुळे सध्याच्या कर्मचाºयांवर बेकारीची कुºहाड कोसळेल. अनुकंपा तसेच वारसा हक्क यादीत अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या उमेदवारांची सरळ सेवेची भरतीदेखील होणार नाही. त्यांना शासकीय नोकरीस मुकावे लागेल. या कर्मचाºयांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणूनच खासगीकरण प्रक्रिया तत्काळ थांबवून ई-निविदा सूचना रद्द करण्याची आवश्यकता आहे, असे राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी सांगितले.काही प्रमुख प्रलंबित मागण्याच्खासगीकरण प्रक्रिया तत्काळ थांबवावी.च्सरळसेवेची सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत.च्अनुकंपा तत्त्वावरील पदे व वारसा हक्काची पदेदेखील तत्काळ भरावीत.च्बदली कामगारांना तत्काळ शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे.च्चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना त्यांच्या पदाऐवजी अन्य कामे देऊ नयेत.

टॅग्स :मुंबईहॉस्पिटल