Join us
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम सुरू

By admin | Updated: July 19, 2014 01:08 IST

सायन - पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलावर पहिल्याच पावसात खड्डे पडल्याचे वृत्त लोकमतने दिले होते

नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलावर पहिल्याच पावसात खड्डे पडल्याचे वृत्त लोकमतने दिले होते. या वृत्ताची दखल घेवून खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. महामार्गावरील सानपाडा व इतर उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. रूंदीकरणाचे काम केलेल्या रस्त्यावरही खड्डे पडले होते. याविषयी वृत्त लोकमतने १४ जुलैला दिले होते. या वृत्ताची दखल घेण्यात आली असून खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.