मुंबई : ऑक्टोबर हिटने मुंबईकरांना चांगलेच घामाघूम केले असून, दिवसा कडक ऊन आणि रात्री मुसळधार पाऊस अशा हवामानाने मुंबईकर हैराण झाले आहेत.
राजस्थानातून सुरू झालेला परतीचा पाऊस महाराष्ट्रासह मुंबईत दाखल झाल्यानंतर जोरदार वा:यासह मुसळधार पावसाचा मुंबईकरांना फटका बसत आहे. विशेषत: परतीच्या पावसाने पहिल्याच दिवशी मुंबापुरीला झोडपून काढले असून, अजूनही त्याचे मुसळधार बरसणो सुरूच आहे. शिवाय ऑक्टोबर हिटने मुंबईकर घामाघूम झाले असून, बुधवारसह गुरुवारी पडलेल्या कडाक्याचे उन्हाने चाकरमान्यांचा घाम काढला.
विलंबाने धावत असलेल्या मध्य रेल्वेमुळे लोकलला चाकरमान्यांची तुफान गर्दी झाली होती. विलंबाने धावत असलेल्या लोकल, धक्केबुक्के देणारी गर्दी आणि डोक्यावर आग ओकणारा सूर्य अशा तिहेरी वातावरणात मुंबईकरांना गुरूवार काढावा लागला. त्यात सूर्य अस्ताला जातो नाही तोवर शहरात सुरू होत असलेल्या पावसाने चाकरमान्यांची तारांबळ उडते आहे. घाम काढणारा दिवस आणि गारवा देणारी रात्र; अशा दुहेरी वातावरणामुळे मुंबईकरांना उकाडय़ाचा त्रस जाणवू लागला.
दरम्यान, परतीच्या पावसाचा मुक्काम अद्याप मुंबापुरीत असून, सलग पाच दिवस परतीच्या पावसाने विश्रंती घेतली तर मुंबईतून पावसाने परतीचा प्रवास केला याची घोषणा करता येईल, असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले. शिवाय पुढील 48 तासांसाठी मुंबईत मेघगजर्नेसह पावसाच्या सरी कोसळतील आणि कमाल व किमान तापमान अनुक्रमे 33, 24 अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)