ठाणे : स्वेटर, मफलर आणि कानटोपी परिधान करून महिलांनी रॅम्पवर चालण्याचा मनसोक्त आनंद लुटला. निमित्त होते ते लोकमत सखी मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विंटर फॅशन शो चे. मेट्रो जंक्शन मॉल, कल्याण येथे सुरू असलेल्या कार्निव्हलमध्ये लोकमत सखी मंचतर्फे विंटर फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सखींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकरीपासून बनविलेले विविध प्रकारचे कपडे, पर्सेस, टोप्या अशी व्हरायटी असलेली वेशभूषा सखींनी केली होती. या वेळी सखींनी विंटर सीझनचे स्वागत मोठ्या उत्साहाने केले. तसेच सखींनी बदलती फॅशन, बदलता ट्रेण्ड यावर भाष्य केले. या वेळी सखींसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उखाणे, कोडी, वन मिनिट गेम शो मध्ये सखींनी सहभाग घेऊन धम्माल उडवून दिली. या स्पर्धेत विजेत्या सखींना बक्षिसे देण्यात आली. विंटर फॅशन शो चे परीक्षण तेजस्विनी क्रिएशनचे संचालक व फॅशन डिझायनर मिलिंद देवरे यांनी केले. या कार्यक्रमाचे गिफ्ट पार्टनर मिसेस नायक्स मसाले होते. कार्यक्रमाकरिता गमाईन रेडिमेड ड्रेसेसचे महेश निसार उपस्थित होते. त्यांच्या गमाईन शो रूमतर्फे प्रत्येक सखीला रु. ५०० चे गिफ्ट व्हाऊचर देण्यात आले. मेट्रो जंक्शन मॉलच्या रिटेल सेंटरचे हेड गझफर अली हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार लोकमत ठाणेचे एजीएम राघवेंद्र शेट यांच्या हस्ते करण्यात आला.प्रथम- ज्योती शेटेद्वितीय- मनाली देशपांडेतृतीय- प्रणाली मानकरउत्तेजनार्थ- विद्या पाटीलउत्तेजनार्थ- अनिता पावसकर
विंटरच्या वेशभूषेत सखींनी लुटला रॅम्पचा आनंद
By admin | Updated: December 29, 2014 23:01 IST