Join us

महिला उमेदवारांचे वावडे

By admin | Updated: October 9, 2014 22:52 IST

श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे

जयंत धुळप, अलिबागरायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, महाड व श्रीवर्धन या सात विधानसभा मतदार संघातील एकूण मतदारांची संख्या १९ लाख ७६ हजार २७२ असून त्यात पुरुष मतदारांच्या १० लाख ११ हजार ६२१ मतदार संख्येच्या जवळपास बरोबरीनेच महिला मतदारांची संख्या ९ लाख ७६ हजार २७२ असतानाही रायगडमधील या सातपैकी एकाही विधानसभा मतदार संघात महिलांना उमेदवारी दिलेली नाही. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. श्रीवर्धनमध्ये पुरुष मतदार १ लाख १७ हजार ७७६ तर महिला मतदार १ लाख २२ हजार ६३९ असल्याने या मतदार संघात तरी प्रमुख राजकीय पक्ष महिला उमेदवारास संधी देतील असे अपेक्षित होते, परंतु ती अपेक्षा देखील फोल ठरली आहे.अपुरी प्रचार सामग्री आणि अपुरे मनुष्यबळ या पार्श्वभूमीवर या दोनही महिला अन्य राजकीय उमेदवारांच्या तुलनेत आज प्रचारात कमी पडत असल्यातरी सरकारच्या महिला धोरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रयत्न महिला वर्गास अभिनंदनास्पद असाच वाटत आहे. निवडणुकीच्या रिंगणात महिलांना उमेदवार म्हणून जरी आम्हाला स्थान देण्याची मानसिकता राजकीय पक्षांची अद्याप होत नसली तरी आम्ही आमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रशासकीय सेवेत येवून, आमचे कार्यकर्तृत्व निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून सिद्ध करुन दाखवू अशा जिद्दीने रायगड जिल्हा निवडणूक यंत्रणेत सध्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा पेण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी निधी चौधरी, महाड विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाड उप विभागीय महसूल अधिकारी सुषमा सातपुते, माणगाव उप विभागीय महसूल अधिकारी प्रशाली दिघावकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा पेण तहसीलदार सुकेशिनी पगारे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा रोहा तहसीलदार उर्मिला पाटील, निवडणूक गाऱ्हाणे, नियंत्रण व मदत कक्ष प्रमुख तथा सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रद्धा सणस या महिला अधिकारी सक्रिय आणि जबाबदारीने कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्यातील मतदार जनजागृती मोहिमेत त्यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी बजावून आपल्या कामाची आगळी चुणूक दाखवून दिली आहे.