Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या व्यापाराला नवा आयाम मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:06 IST

मुंबई : महिला बचत गटनिर्मित उत्पादन पाहून भविष्यात या उत्पादनांची अफगाणिस्थानातील महिला निर्मित उत्पादनांसोबत परस्पर देवाण-घेवाण व व्यापार संधीबाबत ...

मुंबई : महिला बचत गटनिर्मित उत्पादन पाहून भविष्यात या उत्पादनांची अफगाणिस्थानातील महिला निर्मित उत्पादनांसोबत परस्पर देवाण-घेवाण व व्यापार संधीबाबत आपण आशादायी आहोत. तसे झाल्यास अफगाणिस्थान-महाराष्ट्रातील महिलांच्या व्यापाराला नवा आयाम मिळेल, असे मत अफगाणिस्थानच्या काॅन्स्युलेट जनरल झाकिया वर्डेक यांनी व्यक्त केले.

राज्याची महिला विकासाची शिखर संस्था असणाऱ्या माविमचे प्रत्यक्ष फिल्डवरचे शाश्वत काम पाहण्यासाठी माविमच्या प्रतिभा लोकसंचालित साधन केंद्राला झाकिया वर्डेक यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. भेटीदरम्यान त्यांनी माविम अध्यक्ष ज्योती ठाकरे यांच्याशी संवाद साधून, माविमची कार्यप्रणाली समजून घेतली. राज्यातील महिला सक्षम व्हाव्यात, यासाठी सातत्याने कृतियुक्त पद्धतीने कार्यरत राहिल्याबद्दल माविम अध्यक्षांसह संपूर्ण माविम परिवार अभिनंदनास पात्र आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.