Join us

मतदानात महिलांची ‘हाफ सेंच्युरी’!

By admin | Updated: October 17, 2014 01:21 IST

प्रत्येक क्षेत्रत पुरुषांच्या बरोबरीने एव्हाना पुढे जाणा:या महिलांनी मतदानातही आपली पताका फडकावली आहे. मुंबई शहरात महिला मतदानाने 5क् टक्क्यांचा आकडा पार केला आहे.

चेतन ननावरे - मुंबई
प्रत्येक क्षेत्रत पुरुषांच्या बरोबरीने एव्हाना पुढे जाणा:या महिलांनी मतदानातही आपली पताका फडकावली आहे. मुंबई शहरात महिला मतदानाने 5क् टक्क्यांचा आकडा पार केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे धारावी, वरळी आणि कुलाबा या तीन मतदारसंघांत तर पुरुष मतदानाच्या तुलनेत महिला मतदानाची टक्केवारी अधिक आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या मतदान प्रक्रियेअंतर्गत मुंबई शहरातील 1क् विधानसभा मतदारसंघांत सरासरी 53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यात महिला मतदानाची सरासरी 52.62 टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 1क् पैकी 8 मतदारसंघांत महिलांनी केलेल्या मतदानाचे प्रमाण 5क् टक्क्यांहून अधिक आहे. याउलट केवळ 7 मतदारसंघांत 5क् टक्क्यांहून अधिक पुरुषांनी मतदान केले आहे. 
कुलाबा आणि मुंबादेवी मतदारसंघांचा अपवाद वगळता शहरातील सर्व मतदारसंघांत महिला मतदारांचे प्रमाण उत्साहाचे आहे. त्यातही 5क् टक्क्यांहून कमी मतदान असलेल्या कुलाबा परिसरातील महिला मतदानाची टक्केवारी पुरुष मतदानाहून अधिक असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.
कुलाब्यात झालेल्या 46.2क् टक्के मतदानात महिला मतदानाची टक्केवारी 47.42 तर पुरुष मतदानाची टक्केवारी 45.34 इतकी आहे. म्हणजेच कुलाब्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदानाचा टक्का 2 टक्क्यांनी अधिक आहे. वरळीत पुरुष मतदानाची टक्केवारी 55.66 असून महिला मतदानाची टक्केवारी 55.87 इतकी आहे. तर मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि लघु उद्योगांनी व्यापलेल्या धारावी मतदारसंघात महिला मतदानाची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येते. एकीकडे पुरुष मतदारांना 5क् टक्क्यांचा आकडा गाठणो कठीण ठरलेल्या धारावीत महिलांनी मात्र हाफ सेंच्युरी झळकावली आहे. धारावीत 48.71 टक्के पुरुष आणि 5क्.36 टक्के महिला मतदानाची नोंद झाली आहे.
 
मतदारसंघपुरुष महिला 
(टक्के)(टक्के)
कुलाबा45.3447.42
मुंबादेवी47.3844.97
मलबार हिल53.क्951.92
भायखळा55.7753.59
शिवडी55.1453.क्9
वरळी55.6655.87
माहीम59.8557.12
वडाळा62.7359.66
शीव कोळीवाडा53.क्552.27
धारावी48.715क्.36
एकूण53.3152.62
 
प्रशासनाचा मोलाचा वाटा
याआधी नवमतदारांतही महिलांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले होते. शहरातील महिला मतदारांचे आणि मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने विविध मोहिमा राबविल्या होत्या. त्यासाठी जिल्हाधिकारी शैला ए यांनी शासनाच्या विविध आस्थापनांत आणि प्रकल्पांत काम करणा:या अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, सहयोगिनी यांच्या बैठका घेतल्या होत्या. त्याचाच प्रत्यय म्हणून महिला मतदानात वाढ झाल्याचे उपजिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी सांगितले.