Join us

महिला संवाद मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जनआंदोलनांच्या संघर्ष समितीतर्फे महाराष्ट्रातील विविध महिलांना त्यांचे प्रश्न, त्यांचे लढे आणि त्यांचे म्हणणे मांडण्याचा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जनआंदोलनांच्या संघर्ष समितीतर्फे महाराष्ट्रातील विविध महिलांना त्यांचे प्रश्न, त्यांचे लढे आणि त्यांचे म्हणणे मांडण्याचा अवकाश देणारी एक संवाद मोहीम आयोजित करण्यात आली आहे. चावडी सावित्रीची या नावाने ही मोहीम मे महिन्यातील दर गुरुवारी दुपारी दोन ते चार या वेळात होईल. या चावडी सावित्रीची या उपक्रमाचा प्रारंभ ६ मे रोजी छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिनी होणार आहे.

सुरुवातीचा संवाद दोन दिवस म्हणजे ६ व ७ मे रोजी होईल. बाई म्हणून कोरोना काळात आम्ही काय सोसले, या विषयावर महाराष्ट्रातील दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, भटके-विमुक्त, शरीर विक्रय करणाऱ्या महिला, भिन्न लैंगिक ओळख असलेल्या महिला बांधकाम मजूर, घरकामगार महिला, अंगणवाडी व आशा वर्कर्स, नर्सेस अशा विविध विभागांतील महिला अनुभव कथन करणार आहेत. हा सर्व कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे.

......................................