Join us

केईएम रुग्णालयात रक्तदानासाठी महिलांची भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:07 IST

अनोख्या पद्धतीने साजरा केला महिला दिनअनोख्या पद्धतीने साजरा केला महिला दिनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्वच क्षेत्रांत ...

अनोख्या पद्धतीने साजरा केला महिला दिन

अनोख्या पद्धतीने साजरा केला महिला दिन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असलेल्या महिलांचे हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे रक्तदानात प्रमाण कमी आहे. अशात, महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी जीवनदाता संस्थेने रक्तदानासाठी येणाऱ्या महिलेचा ‘रक्तदाता’ म्हणून सन्मानचिन्ह देत सत्कार केला. या वेळी विविध क्षेत्रांतील १५० हून महिलांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला.

केईएम रुग्णालयात जीवनदाता संस्थेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रक्तदानासाठी पात्र ठरणाऱ्या महिलांचा एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे सन्मान करण्यात आला. यात गृहिणीपासून विविध क्षेत्रांतील महिलांनी सहभाग घेतला होता. मात्र हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे १५० पैकी फक्त ३३ जणी रक्तदानासाठी पात्र ठरल्या. मात्र यात सहभाग घेणाऱ्या सर्व महिलांना भेटवस्तू देत त्यांनाही गौरविण्यात आले.

जीवनदाता संस्था २००८ पासून रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहे. वर्षाला किमान ४ ते ५ रक्तदान शिबिरे पार पडत असल्याचे जीवनदाता संस्थेचे प्रमुख अमित आमडोसकर यांनी सांगितले. तसेच, “जागतिक महिला दिनी हळदीकुंकू समारंभ, पिकनिक, गेट टूगेदर किंवा अन्य मनोरंजनात व्यस्त राहणाऱ्या महिलांसाठी ‘घे भरारी... रक्तदानासाठी’ म्हणत या शिबिराचे आयोजन केले होते. यात महिलांच्या सन्मानाबरोबर जास्तीतजास्त संख्येने रक्तदानासाठी पुढे येऊ, अशी शपथ घेतल्याचे संस्थेच्या वीणा आमडोसकर यांनी सांगितले. येथे जमा झालेला रक्तसाठा केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीत जमा करण्यात आला आहे. या वेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह स्वयंसेवक उपस्थित होते.

.....