Join us

महिला स्वच्छतागृहाला मुहूर्तच सापडेना !

By admin | Updated: February 13, 2015 04:54 IST

तीन वर्षांच्या प्रयत्नानंतर महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी जागा मिळाली तरी अद्याप या प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर झालेले नाहीत़ विविध सरकारी

शेफाली परब-पंडित, मुंबई तीन वर्षांच्या प्रयत्नानंतर महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी जागा मिळाली तरी अद्याप या प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर झालेले नाहीत़ विविध सरकारी प्राधिकरणांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे़ तोच आता भूमिगत जलवाहिन्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे़ द्रुतगती महामार्गावर प्रस्तावित स्वच्छतागृहातांच्या जमिनीखालून मुख्य जलवाहिन्यांचा मार्ग असल्याची चिंता वॉर्ड कार्यालयाने घनकचरा व्यवस्थापन खात्याकडे व्यक्त केली आहे़सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याच्या प्रस्तावाला राईट टू पी या मोहिमेनंतर गती मिळाली़ दोन वर्षांपूर्वी पश्चिम द्रुतगती महामार्ग सहा जागा आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर पाच जागा निश्चित करण्यात आल्या होत्या़ सार्वजनिक बांधकाम खाते, एमएमआरडीए आणि बिगर शासकीय संस्थांच्या माध्यमातून मिळालेल्या या जागांच्या मार्गातही विविध भूमिगत उपयोगित सेवांच्या जाळ्यांचा अडथळा निर्माण झाला होता़ अखेर प्रत्येक विभागाकडून मोकळ्या जागांची यादी मागविल्यानंतर ९६ ठिकाणे निश्चित झाली़ मात्र बहुतांशी प्रस्तावित जमिनींखालून भूमिगत जलवाहिनी जात असल्याने ना हरकत प्रमाणपत्रास विभाग कार्यालयाने नकार दर्शविला आहे़ त्यामुळे या प्रकल्पाच्या मार्गातील हा नवीन अडथळा दूर करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन खात्याने जल अभियंता विभागाकडून मत मागविले आहे़ जलवाहिनी फुटण्याचा धोका तसेच मलनिस्सारण वाहिनी जोडणे अवघड असल्याने त्याच जागेच्या ठिकाणी पर्यायी जागा शोधण्याचे आदेश आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिले असल्याचे, सुत्रांकडून समजते़स्वच्छतागृहांच्या या जागांचा प्रश्नविलेपार्ले, अंधेरी येथील एस़व्ही़ मार्ग जंक्शन, जोगेश्वरी येथील इस्माईल युसूफ कॉलेजलगत महामार्गावर दोन्ही बाजूला, गोरेगाव येथील दिंडोशी महामार्गाजवळ, कांदिवली येथील समता नगर पोलिस ठाण्याजवळ महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे़ मात्र जुहू येथे दोन्ही बाजुला सार्वजनिक शौचालये धोकादायक स्थितीत असल्याने तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे़आणखी वर्षभराची प्रतीक्षाया नवीन अडथळ्यांमुळे हा प्रकल्प आता आणखी वर्षभर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे़ या स्वच्छतागृहांची देखभाल पालिकेने नियुक्त केलेल्या बिगर शासकीय संस्थांमार्फत केली जाईल़ अशा संस्थांची यादीही तयार झाली आहे़