Join us

गच्चीवरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या

By admin | Updated: October 8, 2015 03:40 IST

आजाराला कंटाळून ४५ वर्षीय महिलेने ४ मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना अंधेरी येथे घडली. सिंधुताई सावंत असे मृत महिलेचे

मुंबई : आजाराला कंटाळून ४५ वर्षीय महिलेने ४ मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना अंधेरी येथे घडली. सिंधुताई सावंत असे मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी डी.एन. नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.अंधेरी लिंक रोडवरील एसिक नगर वसाहतीत सावंत या कुटुंबीयांसोबत राहत होत्या. सकाळी नऊच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना कूपर रुग्णालयात दाखल केले. दाखल करण्यापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.