Join us

कोटींचा गंडा घालणारी महिला गजाआड

By admin | Updated: June 3, 2014 01:56 IST

‘पैसे डबल’ करण्याचे आमिष दाखवत धारावीतील रहिवाशांना करोडो रुपयांचा गंडा घालणा:या राणी दुराईराज (45) या तरुणीला अखेर धारावी पोलिसांनी अटक केली.

मुंबई : ‘पैसे डबल’ करण्याचे आमिष दाखवत धारावीतील रहिवाशांना करोडो रुपयांचा गंडा घालणा:या राणी दुराईराज (45) या तरुणीला अखेर धारावी पोलिसांनी अटक केली. राणीकडे लाखो रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच यातील काही गुंतवणूकदारांनी धारावी पोलिसांकडे तक्रार केली होती. गुन्हा नोंदवून यातील तीन आरोपींना अटक करून पोलीस राणीच्या शोधात होते. 
दोन वर्षापूर्वी राणीने रौनक शेख (35) या महिलेच्या मदतीने धारावीत ठरावीक काळात पैसे डबल ही फसवी योजना आणली. गुंतवणूकदार आणल्यास रौनकला कमिशन देण्याचे आमीष राणीने दाखवले. त्यामुळे रौनकने वा:याच्या वेगाने या योजनेचा प्रचार आणि प्रसार धारावीत केला. सोबत अनेकांना या योजनेत पैसे गुंतवण्यास भाग पाडले. सुरुवातीला काहींनी 5क् हजार ते एक लाख रुपये या योजनेत गुंतवले. गुंतवणूकदारांचा विश्वास बसावा यासाठी राणीनेही गुंतवणूकदारांना ठरावीक मुदतीत एकाचे दोन लाख देऊन खूश केले. त्यामुळे धारावीतल्या अनेकांनी दागिने गहाण ठेवत, उधार घेत तर कोणी कर्ज काढून या योजनेत दहा ते बारा लाखांर्पयत गुंतवणूक केली. दोन ते अडीज कोटी रुपये जमा झाल्यानंतर राणीने मोबाइल फोन बंद करून धारावीतून पळ काढला. गुंतवणूकदारांना दिलेली मुदत संपली. तरी तिचा पत्ता नव्हता. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांना लक्षात आले. गुंतवणूकदारांनी रौनकला पकडले. मात्र तिची पैसे परत करण्याची ऐपत नव्हती. अखेर गुंतवणूकदार पोलीस ठाण्यात धडकले. 
फेब्रुवारी महिन्यात धारावी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून रौनकसह मोहंमद शेख आणि तन्वीर शेख अशा तिघांना अटक केली. मात्र या घोटाळ्याची मुख्य सूत्रधार राणी फरार होती. तिचा शोध सुरूच 
होता. (प्रतिनिधी)
 
राणी दुराईराज हिला न्यायालयाने 9 जूनर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उच्च शिक्षित राणीने विवाह केलेला नाही. धारावीतून आतार्पयत 15 जणांनी तिच्या विरोधात तक्रार केली असून, तिने आणखी काही लोकांना फसवल्याचा संशय असून, त्यानुसार तिच्याकडे चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.