Join us

महिलेची गळा चिरून हत्या

By admin | Updated: May 12, 2014 03:18 IST

उल्हासनगरमध्ये राहणार्‍या ४५ वर्षीय निम्मी पंजवानी या महिलेची भर दिवसा गळा चिरून हत्या करण्यात आली .

उल्हासनगर : शहरातील २५ सेक्शन, राहुल इमारती मध्ये राहणार्‍या ४५ वर्षीय निम्मी पंजवानी या महिलेची भर दिवसा गळा चिरून हत्या करण्यात आली . विठ्ठलवाडी पोलिसानी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.सकाळी पती व मुलगा सागर हरीलाल पंजवानी वाशी येथील ड्रायफूटच्या दुकानात गेल्यावर त्या घरात एकटयाच होत्या. त्याचा फायदा अज्ञात इसमाने उठवून दुपारी १.३० ते रात्री ११ च्या दरम्यान धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून हत्या केल्याच्या संशय विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय डोळस यांनी व्यक्त केला आहे. रात्री ११ वाजता पती हरीलाल व मुलगा सागर घरी आल्यावर त्या त्यांना रक्ताच्या थारोळयात पडलेल्या दिसल्या. सागर यांने त्वरीत विठ्ठलवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. (प्रतिनिधी)