Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातात तरुणीने पाय गमावला

By admin | Updated: October 23, 2016 04:29 IST

आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून मुंबईतील स्टेट इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर या संस्थेत प्रवेश परीक्षेसाठी पुण्याहून मुंबईला आलेल्या तरुणीला

कल्याण : आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून मुंबईतील स्टेट इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर या संस्थेत प्रवेश परीक्षेसाठी पुण्याहून मुंबईला आलेल्या तरुणीला कल्याण रेल्वे स्थानकात गुरुवारी अपघातात एक पाय गमवावा लागला. सायली संजय ढमढेरे असे या तरुणीचे नाव आहे. तिच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातील जुन्नरमधील उद्धापूर गावची रहिवासी असलेल्या सायलीने विज्ञान शाखेची तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिली आहे. मुंबईतील संस्थेत परीक्षा झाल्यानंतर गुरुवारी पुण्याला परत जाण्यासाठी मैत्रिणीसह कल्याण स्थानकात आली होती. मात्र, तेथे चालती इंद्रायणी एक्स्प्रेस पकडताना सायलीचा तोल गेला आणि ती गाडीखाली पडली. प्रवाशांचा आरडाओरडा झाल्यानंतर ड्रायव्हरने गाडी थांबवली. मात्र, या अपघातात तिला डावा पाय गमवावा लागला. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात शुक्रवारी नोंद केली. तिची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)