Join us

पालिकेत सफाई कामगार असलेल्या महिलेने भांडुपमध्ये घेतली अठराव्या मजल्यावरून उडी

By मनीषा म्हात्रे | Updated: August 20, 2023 20:00 IST

भांडुप टेंभीपाडा परिसरात राहणाऱ्या सोळंकी या पालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या

मुंबई - भांडुपमध्ये रिना सोळंकी (४७) या महिलेने रविवारी सकाळी इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. आजारपणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत अधिक तपास करत आहे. 

भांडुप टेंभीपाडा परिसरात राहणाऱ्या सोळंकी या पालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. याच परिसरात राहण्यास असलेल्या त्रिवेणी संगम हरिजन या एसआरए इमारतीत राहणाऱ्या एका नातेवाईकाकडे त्या रविवारी सकाळी आल्या  होत्या. याठिकाणी महिलेने अठराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना याची माहिती मिळताच, त्यांनी तत्काळ भांडुप पोलिसांना कळवले. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महिला आजारी असल्याने कामावरही गैरहजर होत्या. याच कारणावरून तिने ही आत्महत्या केल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याबाबत, पोलीस अधिक तपास करत आहे.