Join us

आरेत बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:11 IST

मुंबई : गोरेगाव पूर्व, आरे कॉलनी, प्रभाग ५२, युनिट ३१ मधील रहिवासी लक्ष्मी उंबरसडे ही आदिवासी महिला काल रात्री ...

मुंबई : गोरेगाव पूर्व, आरे कॉलनी, प्रभाग ५२, युनिट ३१ मधील रहिवासी लक्ष्मी उंबरसडे ही आदिवासी महिला काल रात्री ९.३० च्या सुमारास घरी परत येत असताना तिच्यवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात सदर महिला जखमी झाली.

गेले काही महिने दिंडोशी न्यू म्हाडा कॉलनी, आरे येथे बिबट्या येत आहे, तर गेल्या सोमवारी पहाटे ओबेरॉय मॉलसमोरील शिवधाम संकुल परिसरात बिबट्या आला होता, तर काल रात्री बिबट्याने लक्ष्मी उंबरसडे या महिलेवर हल्ला केला. येथील परिसरात बिबट्याचा होणारा वावर लक्षात घेता, वनविभागाने येथे पिंजरा लावून, या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर, प्रभाग ५२ च्या नगरसेविका प्रीती सातम या घटना स्थळी जाऊन सदर महिला व तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली, तसेच त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला व रात्री प्रवास करताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले. या ठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था करण्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांचीही बोलणी केली असून, लवकरच त्या संदर्भात कार्यवाही होईल, अशी माहिती त्यांनी दिली.