Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाचव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

By admin | Updated: August 23, 2015 00:18 IST

फ्लॅटच्या बाल्कनीतील झाडांना पाणी घालताना पाचव्या मजल्यावरून खाली पडून एका ५५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी घडली. विजया सिस्तला असे त्यांचे नाव

मुंबई : फ्लॅटच्या बाल्कनीतील झाडांना पाणी घालताना पाचव्या मजल्यावरून खाली पडून एका ५५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी घडली. विजया सिस्तला असे त्यांचे नाव असून, मलबार हिल पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या इमारतीच्या एकाही बाल्कनीला ग्रील नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.मलबार हिल परिसरातील वसंत विहार इमारतीमधील पाचव्या मजल्यावर विजया पती व मुलांसमवेत राहतात. त्यांचे पती रिझर्व्ह बॅँकेत अधिकारी आहेत. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्या बाल्कनीतील फुलझाडांना पाणी घालत होत्या. अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या खाली पडल्या. डोक्यावर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. वॉचमन व स्थनिकांनी त्यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी त्यांचे पती व मुलांचा जबाब नोंदवला आहे. त्यांनी या प्रकाराबाबत कोणाबाबतही संशय नसल्याचे नमूद केले आहे. (प्रतिनिधी)