Join us

सततच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या

By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST

सततच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या

सततच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या

बहिणीचा पती आणि प्रियकराकडून सतत अत्याचार

सांताक्रूज: येथे राहणार्‍या एका १७ वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी या अल्पवयीन मुलीने लिहिलेल्या चिठ्ठीत मुलीच्या बहिणीच्या नवर्‍याने आणि महाविद्यालयात शिकणार्‍या प्रियकराने बलात्कार केल्याने मानसिक तणावाखाली आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बुधवारी संध्याकाळी पीडित मुलीची आई बाजारात गेली असता मुलीने घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. आई घरी परतताच हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. घटनेची माहिती वाकोला पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दोन वर्षांपूर्वी बहिणीच्या लग्नासाठी ती उत्तरप्रदेशात गेली होती. त्यावेळी बहिणीच्या नवर्‍याने धमकावत तिच्यावर बलात्कार केला होता. याबाबत वाच्यता केल्यास बहिणीशी लग्न करणार नाही, असेही त्याने धमकावले होते. काही काळानंतर महाविद्यालयात बीकॉमच्या पहिल्या वर्गात शिकणार्‍या तरुणाशी पीडित मुलीची ओळख झाली. त्या तरुणानेही लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याने ती मानसिक तणावाखाली होती. (प्रतिनिधी)