मुंबई : व्यावसायिक सेवा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या डब्ल्यूएनएसने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतील कामगिरीची घोषणा केली असून, या कालावधीत कंपनीला १ कोटी २८ लाख अमेरिकी डॉलर इतका नफा झाला आहे. यापूर्वी याच कालवधीत कंपनीला १ कोटी २१ लाख अमेरिकी डॉलरचा नफा झाला होता. याच कालावधीत कंपनीला ६ नवे ग्राहक लाभले असून, कंपनीच्या उलाढालीतदेखील घसघशीत वाढ झाला असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी केशव मृगेश यांनी दिली. आमच्या विक्री तसेच उलाढालीत वाढ नोंदली गेली असून, डोमेन एक्स्पर्टी आणि अॅनालिटिक्स तसेच डिजिटलायझेशनच्या क्षेत्राकडेच विशेष लक्ष आम्ही देऊ, असेही मृगेश यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले.
डब्ल्यूएनएसला १ कोटी २८ लाख डॉलरचा नफा
By admin | Updated: July 17, 2015 23:39 IST