Join us

चर्चा न होताच वीजनिर्मिती प्रकल्प मंजूर

By admin | Updated: August 28, 2014 00:13 IST

मोरबे धरण परिसरामध्ये वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प मंजूर करण्यात आला. यासाठी १६३ कोटी रुपये खर्च होणार आहेत.

नाशिक : महापालिकेत प्रभारी आयुक्तांनी नागरी कामांच्या फाईलीवर सह्या कराव्या यासाठी आग्रह धरणाऱ्या नगरसेवकांना टाळून सोनाली पोंक्षे-वायंगणकर दालनाच्या मागील बाजूने निघून गेल्या. त्यामुळे मनसेच्या नगरसेवकांनी रुद्रावतार धारण करीत आयुक्तांच्या दालनाबाहेर गोंधळ घातला. तसेच ठिय्या आंदोलन सुरू केले. नगरसेवकांना अवमानास्पद वागणूक देणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या बदलीचा हट्ट त्यांनी धरला. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी मध्यस्थी करून सर्व फाईल्स मंजूर करण्याचे आश्वासन दिले तसेच दोन सुरक्षारक्षकांची तडकाफडकी बदली केल्यानंतर नगरसेवक शांत झाले.पालिकेत पूर्णवेळ आयुक्त नसून प्रभारी आयुक्तपदाचा कार्यभार विभागीय आयुक्तालयातील सहायक आयुक्त सोनाली पोंक्षे-वायंगणकर यांच्याकडे देण्यात आला आहे. त्या पालिकेत पूर्णवेळ थांबत नाहीत, तसेच नागरी कामांच्या प्रस्तावांवर सह्या करीत तर नाहीच; परंतु ठेकेदाराला कार्यारंभ देण्याच्या अंतिम प्रस्तावावरही सह्या करीत नाहीत. पालिकेत अशा शेकडो फाईल्स तुंबल्या आहेत. मंगळवारी काही नगरसेवकांनी आयुक्तांची प्रतीक्षा केल्यानंतर त्या बुधवारी पालिकेत वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीसाठी येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे बैठक सुरू असताना अनेक नगरसेवक आयुक्तांच्या भेटीसाठी ताटकळत होते. बैठक संपल्यानंतर आयुक्तांच्या दालनात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दीपाली कुलकर्णी यांना सुरक्षारक्षकाने हात धरून बाहेर काढले, तर दुसरीकडे आयुक्त दालनाला पाठीमागील दार नसल्याने त्या परस्पर जाणार नाहीत, असे या नगरसेवकांना येथील शिपाई आणि सुरक्षारक्षकांनी सांगितले. तथापि, आयुक्त मागील दाराने निघून गेल्या ही बाब समजल्यानंतर सुवर्णा मटाले, शीतल भामरे, दीपाली कुलकर्णी, डॉ. विशाल घोलप, भाजपाच्या रंजना भानसी, शालिनी पवार आणि राष्ट्रवादीच्या सुनीता शिंदे यांनी संताप व्यक्त केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी खोटी माहिती दिली असे सांगतानाच त्यांनी आयुक्तांच्या कारभारावर टीका केली. (प्रतिनिधी)