अलिबाग : दगडखाणीवर मजुर म्हणून काम करणाऱ्या शायलु आशाप्पा उसके या मजुराच्या मुलीवर केवळ त्याचे रेशनकार्ड नवीन असल्यामुळे शासनाच्या राजीव गांधी आरोग्य योजनेच्या यंत्रणेने लाभ देण्यास असमर्थता दर्शविली होती. परिणामी उसके यांच्या समोर मोठा यक्षप्रश्न उभा राहीला होता. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी या प्रकरणी नवीन रेशनकार्डची अट शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी शायलु आशाप्पा उसके यांच्या मुलीची हृदयशस्त्रक्र ीया नवी मुंबईतील एम.जी.एम.हॉस्पीटल मध्ये करण्यांत येणार असल्याचे राजीव गांधी आरोग्य योनजनेच्या कार्यालयातून उसके यांना कळविण्यात आल्याने दगडखाणीवर मजूरी करणाऱ्या गरीब पित्याला अखेर शासनाकडून न्याय मिळÞाला आहे.आता सरसकट सर्व पिवळया व केशरी कार्डधारकांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय देखील शेट्टी यांनी घेतला आहे. जाचक अटींमुळे शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेपासून लाभार्थी वंचित रहात आहेत.
मजुरी करणाऱ्या पित्याला अखेर न्याय
By admin | Updated: July 5, 2014 03:34 IST