Join us
Daily Top 2Weekly Top 5

मीरा रोडमधील 242 घरांचे विजेते निश्चित

By admin | Updated: July 10, 2014 02:33 IST

एक-दोन वर्षे नव्हे तर तब्बल दीड दशकापूर्वी जाहिरात काढण्यात आलेल्या म्हाडाच्या मीरा रोडमधील घरांच्या लॉटरीला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला.

मुंबई : एक-दोन वर्षे नव्हे तर तब्बल दीड दशकापूर्वी जाहिरात काढण्यात आलेल्या म्हाडाच्या मीरा रोडमधील घरांच्या लॉटरीला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला. कोकण मंडळाच्यावतीने ‘स्विस चॅलेंज’ पद्धतीने बांधण्यात आलेल्या 253 पैकी 242   सदनिकांचे मंगळवारी संगणकीय पद्धतीने विजेते निश्चित करण्यात आले. 15 वर्षापूर्वी अर्ज केलेल्या या भाग्यवान नागरिकांच्या चेह:यावर समाधानाची लकेर पसरली.
लॉटरीतील विजेत्यांना सृष्टी संकुलाजवळील म्हाडा वसाहतीमध्ये बांधलेल्या 226 चौरसफुटांचे घर 1क् लाख 68 हजार 21क् रुपयांना मिळणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया 15 दिवसांत सुरू केली जाणार असल्याचे अधिका:यांकडून जाहीर करण्यात आले. ‘स्विस चॅलेंज’ पद्धतीने बांधण्यात येणा:या गृहसंकुलासाठी कोकण मंडळाने 1999 मध्ये पहिल्यांदा इच्छुकांसाठी जाहिरात काढली होती. मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली. 2क्क्क् व 2क्क्6 मध्ये त्यासाठी पुन्हा अर्ज मागविण्यात आल्यानंतर एकूण 272 जणांचे अर्ज आले होते. दरम्यान, प्रकल्पाचे काम विविध कारणांमुळे रेंगाळल्याने त्याची लॉटरी काढण्यात आली नाही. या प्रकल्पाच्या दुस:या टप्प्यातील योजना पूर्ण झाल्यानंतर त्यातील 272 सदनिका राखीव ठेवून 2क्12 मध्ये उर्वरित घरांसाठी नव्याने अर्ज मागवून लॉटरी काढण्यात आली. अखेर  या घरांसाठी पुन्हा संबंधितांकडून अर्ज मागविण्यात आल्यानंतर त्यापैकी 253 जणांनी अर्ज केले होते. त्याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने मंगळवारी वांद्रे येथील एमआयजीमधील समाज मंदिरात सोडत काढून त्याचे विजेते निश्चित करण्यात आले. यशस्वी अर्जदारांना येत्या 15 दिवसांमध्ये पत्रे पाठविली जातील. पात्रता निश्चित झाल्यानंतर एका महिन्यात 25 टक्के व उर्वरित रक्कम पुढील दोन महिन्यांमध्ये भरावी लागेल, असे कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)