Join us

मुंबईला २४ तासांसाठी वादळी पावसाचा इशारा

By admin | Updated: June 12, 2016 04:44 IST

शनिवारी सकाळी मुंबई आणि उपनगरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून पुढील २४ तासांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल, असा इशारा मुंबई

मुंबई : शनिवारी सकाळी मुंबई आणि उपनगरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून पुढील २४ तासांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.अंदमान, पश्चिम बंगाल आणि केरळ असा प्रवास करत दक्षिण भारतात दाखल झालेल्या मान्सूनचे राज्यात आगमन झालेले नाही. मान्सून तामिळनाडूसह कर्नाटकात असला तरी राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. येत्या ३ दिवसांत नैऋत्य मौसमी पावसाची वाटचाल मध्य व उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागासह ईशान्यकडील राज्याच्या काही भागात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे. (प्रतिनिधी)मागील चोवीस तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.१२ ते १५ जून : दक्षिण कोकण, गोवा, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.