मुंबई : मेट्रो ३ प्रकल्पासाठी दादरमधील अनेक रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे दादरकर धास्तावले आहेत. मराठी माणसाच्या मुळावर उठणाऱ्या अशा प्रकल्पांची मुंबईला गरज नसल्याचे सांगत दादरकरांना हात लावू देणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकार तसेच एमएमआरडीएला दिला आहे. गिरगाव, आरे कॉलनीनंतर आता दादरमध्ये मेट्रो ३ प्रकल्पावरून रणकंदन सुरू आहे. या प्रकल्पासाठी दादरमधील शेकडो रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन एमएमआरडीए आणि सरकारकडून देण्यात आले आहे. मात्र पुनर्वसनावर आपला विश्वास नसून, मराठी भागातील नागरिकांबाबतच्या पुनर्वसनाचा मुद्दा का उपस्थित केला जात आहे, हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. (प्रतिनिधी)
‘दादरकरांना हात लावू देणार नाही’
By admin | Updated: June 17, 2015 03:10 IST