Join us

स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकल दोन महिन्यांनंतर येणार ?

By admin | Updated: October 29, 2014 01:52 IST

लोकलची गर्दी आटोक्यात आणतानाच लोकलमधून पडून होणा:या अपघातांना आळा घालण्यासाठी लोकलच्या दरवाजांना ऑटोमॅटीक क्लोज डोअर (स्वयंचलित दरवाजे) बसवण्यात येणार आहेत.

मुंबई : लोकलची गर्दी आटोक्यात आणतानाच लोकलमधून पडून होणा:या अपघातांना आळा घालण्यासाठी लोकलच्या दरवाजांना ऑटोमॅटीक क्लोज डोअर (स्वयंचलित दरवाजे) बसवण्यात येणार आहेत. अशा एका लोकलची महालक्ष्मी वर्कशॉपमध्ये चाचणी घेतली जात असून दोन महिन्यानंतर पश्चिम रेल्वेवर ती प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येईल.
गर्दीच्या वेळेत लोकलच्या दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करणा:या प्रवाशांना ब:याच वेळेला अपघाताला तोंड द्यावे लागते. लोकलमधून पडून अपघात होण्याच्या घटना घडताना यात अनेकांचे प्राण जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोकलच्या दरवाजाला ऑटोमॅटीक क्लोज डोअर बसवण्यात यावे, जेणोकरून गर्दी आटोक्यात येतानाच अपघातांनाही आळा बसेल असे रेल्वे प्रशासनाकडून मत व्यक्त करण्यात येत होते. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने लोकलच्या डब्यांना ऑटोमॅटीक क्लोज डोअर बसवून त्याची चाचणी घेण्याचाही निर्णय घेतला. प्रथम पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी कारशेडमध्ये लोकलच्या एका महिला डब्याला ऑटोमॅटीक क्लोज डोअर बसवून त्याची 
चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वीही झाली. 
महालक्ष्मी वर्कशॉपमध्ये उभ्या असलेल्या या लोकलची आणखी चाचण्या सुरु असून पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांच्याकडून मंगळवारी त्याची पाहणी करण्यात आली. या लोकलमध्ये कुठले बदल हवेत, सुरक्षेचे उपाय काय याची माहिती यावेळी महाव्यवस्थापकांकडून घेण्यात आली. कारशेडमधील चाचणीनंतर आणखी एक चाचणी मुख्य मार्गावर प्रवाशांविना घेतली जाणार आहे आणि त्यानंतर प्रवाशांसाठी ती प्रायोगिक तत्वावर साधारणपणो दोन महिन्यानंतर चालवण्यात येईल. ऑटोमॅटीक क्लोज डोअरला मिळणारा प्रतिसाद  पाहूनच पश्चिम रेल्वेकडून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
 
च्महिला प्रथम श्रेणीच्या डब्याला ऑटोमॅटीक क्लोज डोअर बसवून या लोकलची चाचणी सध्या घेण्यात येत आहे. लोकलचे दरवाजे बंद होण्यास अडीच सेकंद आणि उघडण्यास अडीच सेकंद लागत आहेत. या लोकलमधील वेंटिलेशन आणखी वाढवण्यात यावे, अशा सूचना महाव्यवस्थापकांनी केल्या आहेत. 
 
च्या लोकलची वर्कशॉपमध्ये चाचणी घेण्यात आली. आता आणखी काही चाचण्या विनाप्रवाशांसह घेण्यात येतील आणि त्यानंतर प्रायोगिक तत्वावर ही लोकल पश्चिम रेल्वेवर चालवण्यात येईल. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे पश्चिम रेल्वे- मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी सांगितले.