Join us

कर्जत-पनवेल लोकलचा विचार होणार का?

By admin | Updated: July 8, 2014 00:06 IST

सात ते आठ वर्षांपूर्वी कर्जत - पनवेल लोहमार्ग खुला करण्यात आला.

कर्जत, विजय मांडे : सात ते आठ वर्षांपूर्वी कर्जत - पनवेल लोहमार्ग खुला करण्यात आला. सुरु वातीला या मार्गावरून मालवाहतूक सुरु झाली.त्यानंतर काही प्रवासी एक्स्प्रेस गाड्या या मार्गावरून धाऊ लागल्या. कोट्यावधी रु पये खर्च करून या मार्गाचे काम सुरु झाले तेव्हा आता कर्जत- पनवेल लोकल सेवा सुरु होणार असे वाटले होते, परंतु केवळ भ्रमनिरास झाला. एक नाही अनेक तांत्रिक कारणे रेल्वे प्रशासनाकडून दाखिवली जातात व लोकल सेवा लांबणीवर टाकण्यात येत आहे. नवीन आलेले सरकार या अर्थ संकल्पात लोकल सेवा सुरु करण्यासाठी काय घोषणा करते याकडे हजारो प्रवाशांचे लक्ष लागले आहे.कर्जत ,खोपोली हून हजारो चाकरमानी ,व्यावसायिक ,विद्यार्थी मुंबई पुण्याकडे रेल्वे मार्गाने प्रवास करतात.तसेच हजारो जण वाशी, नवी मुंबई कडे कामानिमित्त ये- जा करीत असतात त्यांना रस्त्याने किंवा ठाणे मार्गे पनवेल वाशी कडे जावे लागते. कर्जत पनवेल लोहमार्गाची उभारणी सुरु झाली तेव्हा अनेकजण आनंदित झाले होते.परंतु त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. रेल्वे मार्ग पूर्ण झाला अगदी पावणे दोन कि.मी.अंतराच्या बोगद्याचे कामही झाले, मात्र या मार्गावरून मालवाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु झाली.प्रवासी वाहतूकही कालांतराने सुरु झाली. परंतु ठराविक लांब पल्ल्याच्या गाड्या या वरून धाऊ लागल्या.लोकल सेवा सुरु करण्यासाठी अनेकांनी पत्रव्यवहार सुरु केला परंतु त्याला यश आले नाही.कर्जत रेल्वे प्रवाशी संघटनेचे पदाधिकारी पंकज ओसवाल यांनी तर माहितीच्या अधिकाराचा वापर करून रेल्वे प्रशासनाला हैराण करून सोडले आहे.मध्यंतरी नवर्निवाचित खासदार श्रीरंग बारणे व माजी आमदार देवेंद्र साटम यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन लोकल सेवे बद्दल चर्चा केली त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यास हा मार्ग असंख्य प्रवाश्यांना हा मार्ग खुला होईल.म्हणूनच प्रवासी वर्ग आगामी रेल्वे अर्थ संकल्पाची चातकासारखी वाट पहात आहेत.