Join us

दहिसर भुयारी मार्गाची स्वच्छता कायम राहणार का? दहिसरकरांचा सवाल

By मनोहर कुंभेजकर | Updated: January 29, 2024 19:41 IST

मुंबई - दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी यांनी हातात झाडू घेत आणि पालिकेच्या आर उत्तर विभागाने पाण्याचा फवारा मारत नुकतीच ...

मुंबई- दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी यांनी हातात झाडू घेत आणि पालिकेच्या आर उत्तर विभागाने पाण्याचा फवारा मारत नुकतीच दहिसर भुयारी मार्गाची स्वच्छता केली.मात्र  येथील स्वच्छता, साफसफाई सातत्य रहाणार का? दहिसर पूर्वेला (ईस्ट) भुयारी मार्गातून बाहेर पडल्यावर सार्वजनिक मुतारीच्या घाणेरड्या वासातून मुक्तता मिळणार का?असा सवाल येथील म्हात्रे वाडी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद दिघे यांनी पालिका आणि रेल्वे प्रशासनाला विचारला आहे.

हा भुयारी मार्ग नक्की रेल्वेचा की जाणून बुजून दुर्लक्षित करणाऱ्या महानगर पालिकेच्या मालकीचा हे समजेल का? भुयारी मार्ग सकाळी ५.३० किव्हा ६.०० वाजता उघडला जातो व रात्री १०.००.ते १०.३०वाजता बंद होतो,  त्यामुळे हजारो नागरिकांची गैरसोय होते याची दखल कोण आणि कधी घेणार असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला आहे.या समस्यांमधून दहिसरकरांना कायमचा दिलासा कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत येथील नागरिक आहेत.

टॅग्स :दहिसरमुंबई