Join us
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिस्ती मतांचे विभाजन टाळणार?

By admin | Updated: September 30, 2014 23:39 IST

सहाही मतदारसंघातील लढतीचे चित्र उद्या स्पष्ट होणार आहेत. उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून अनेक अपक्ष उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी अपेक्षा आहे

दिपक मोहिते ल्ल वसई
सहाही मतदारसंघातील लढतीचे चित्र उद्या स्पष्ट होणार आहेत. उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून अनेक अपक्ष उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी अपेक्षा आहे. काल चंद्रशेखर धुरी यांनी अचानकपणो आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे वसई येथे लढतीची समीकरणो झपाटय़ाने बदलली. आता ख्रिस्ती समाजाच्या मतांची विभागणी टाळण्यासाठी जनतादलाच्या एका पूर्वाo्रमीच्या नेत्याने जोरदार प्रय} चालवले आहेत. त्यांच्या प्रय}ास यश आल्यास जनआंदोलन समितीचे विवेक पंडीत, काँग्रेसचे मायकल फुटर्य़ाडो व अपक्ष उमेदवार मनवेल तुस्कानो यांच्यामध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. परंतु तुस्कानो यानी सदर चर्चा बंद खोलीत न होता, जाहीर सभेत व्हावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे ही बैठक होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
सेना-भाजपा युती व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्यामुळे या निवडणुकीतील राजकीय समीकरणो पार बदलून गेली आहेत. गेल्यावेळी शिवसेनेने अपक्ष उमेदवार विवेक पंडीत यांना पुरस्कृत केले होते. यंदाही सेनेने त्यांच्यासमोर उमेदवार उभे न करत त्यांना पुन्हा पुरस्कृत केल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु भाजपच्या चंद्रशेखर धुरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंडीतांची धावाधाव सुरू झाली व त्यांनी धुरी यांनी माघार घ्यावी यासाठी जोरदार प्रय} सुरू झाले. अखेर काल भाजपाने उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले व पंडीत यांचा जीव भांडय़ात पडला. राज्यस्तरावर युती तुटली असताना भाजपाने सेनेकडून पुरस्कृत झालेल्या उमेदवारासाठी माघार घेतल्यामुळे राजकीय वतरुळामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
येत्या रविवारी या मतदारसंघातील सर्व उमेदवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. एका सामाजिक संस्थेने ‘उमेदवारी कशासाठी’ या विषयावर आपली मते मांडण्यासाठी प्रमुख उमेदवारांना पाचारण केले आहे. यावेळी प्रत्येक उमेदवाराला आपले व्हीजन मतदारांसमोर मांडावे लागणार आहे. या मतदारसंघात सतत घडत असलेल्या राजकीय घडामोडीमुळे येथील निवडणूक संघर्षमय वातावरणात होण्याची शक्यता आहे. पंडीत, तुस्कानो व फुटर्य़ाडो या तिघांमध्ये बैठक होऊन चर्चा झाल्यास मनवेल तुस्कानो कदाचीत आपली उमेदवारी मागे घेतील अशी शक्यता आहे. परंतु यंदा जर त्यांनी उमेदवारी मागे घेतली तर मात्र त्यांच्या एकंदरीत राजकीय कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
4भाजपाच्या या निर्णयामुळे ख्रिस्ती समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सेनेने पुरस्कृत केलेल्या उमेदवारालाच भाजपही कसे पुरस्कृत करते यावर सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. गेल्यावेळी मिळालेल्या मतामध्ये विभागणी होता कामा नये याकरीताच पुरस्कृत खेळ रंगात आला. परंतु त्याचे दूरगामी परिणाम मात्र ख्रिस्ती समाजाच्या मतदानावर होण्याची शक्यता आहे. 
 
4सन 2क्क्9 पूर्वी झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये ख्रिस्ती मतदारांनी सेना-भाजपाच्या उमेदवाराला कधीही मतदान केले नाही. त्यामुळे यंदा ख्रिस्ती समाजाची मते पंडीतांना मिळतील का? याबाबत सर्वत्र साशंकता व्यक्त होत आहे. 
4प्रचारादरम्यान आ. पंडीत यांना अनेक ठिकाणी मतदारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मर्देस येथे त्यांना स्थानिक मतदारांच्या रोषालाही सामोरे जावे लागले.