Join us

धर्म बदल, तरच लग्न लावीन.. कल्याणमध्ये लव जिहाद?

By admin | Updated: April 10, 2015 09:00 IST

तरुण आणि तरुणीचे प्रेमसंबंध जुळले, परंतु धर्म वेगवेगळे असल्याने प्रेमाच्या रेशीमगाठी जुळू शकल्या नाहीत. यात प्रियकराच्या वडिलांनी तुझा धर्म बदल,

कल्याण : तरुण आणि तरुणीचे प्रेमसंबंध जुळले, परंतु धर्म वेगवेगळे असल्याने प्रेमाच्या रेशीमगाठी जुळू शकल्या नाहीत. यात प्रियकराच्या वडिलांनी तुझा धर्म बदल, तरच लग्न लावीन, असा धर्मांतराचा आग्रह धरल्याने तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याणमधील या घटनेतून लव्ह जिहादसारखे धककादायक प्रकरण उघडकीस आले आहे. दरम्यान, या झालेल्या लैंगिक अत्याचार तसेच फसवणुकीप्रकरणी धक्का बसलेल्या पीडित तरुणीने एमएफसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.दोघेही राहणारे कल्याणमधील नसले तरी येथील एका लॉजमध्ये शरीरसंबंध झाल्याने पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून घेत पुढील तपासाला सुरुवात केली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू असल्याची प्रतिक्रिया पोलीस उपनिरीक्षक निसरड यांनी लोकमतशी बोलताना दिली. (प्रतिनिधी)