शेफाली परब-पंडित, मुंबईमुंबई शहराच्या नियोजनात विकास आराखड्याचे मोठे योगदान मानले जाते़ मात्र विकासाची दिशा आराखड्यानुसारच सुरू आहे का? याची शहानिशा करण्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही़ परिणामी हा आराखडा तयार करण्यासाठी खर्च होणारे मनुष्यबळ, वेळ आणि पैसा वाया जात आहे़ त्यामुळे सहा दशकांमध्ये पहिल्यांदाच पुढील २० वर्षांमधील विकासाचे निरीक्षण व मूल्यांकन होणार आहे़२०१४ ते २०३४ या २० वर्षांमध्ये मुंबईच्या विकासाचे नियोजन करण्यासाठी आराखडा तयार होत आहे़ या आराखड्याचे प्रारूप नुकतेच जाहीर करण्यात आले़ यामधील शिफारशी व काही सुधारणांवर विविध स्तरांवर टीका-टिप्पणी, चर्चा व ऊहापोह सुरू आहे़ चटईक्षेत्र निर्देशांक आठपर्यंत वाढविणे, मुख्य रेल्वे स्थानकाबाहेर मिनी बीकेसी उभे राहण्यासाठी प्रोत्साहन, आरे कॉलनी हा हरितपट्टा विकास या शिफारशींच्या उद्देशावर सवाल उठविला जात आहे़विकास आराखड्यातील तरतुदीनुसार विकास होतो का, यावरही सवाल उपस्थित केला जात आहे़ यापूर्वीच्या दोन आराखड्यांचे मूल्यमापन झाले नव्हते़ त्यामुळे आराखड्याचा खराच उपयोग होतो का, हेदेखील कळण्याचा मार्ग नाही़ परिणामी नवीन विकास आराखडा तयार करण्यापूर्वी विद्यमान भूवापर सर्वेक्षण करावे लागत आहे़ ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने यापुढे आराखड्याचे वार्षिक मूल्यांकन करण्याची शिफारस करण्यात आली आहे़
आराखड्याचा निकाल लावणार
By admin | Updated: February 25, 2015 03:56 IST