Join us
Daily Top 2Weekly Top 5

विकी शर्माच्या हत्येप्रकरणी शार्पशूटरला केले जेरबंद

By admin | Updated: February 7, 2017 05:25 IST

बांधकाम व्यावसायिक अमित पाटील यांचा अंगरक्षक विकी शर्मा याच्या हत्येप्रकरणी शार्पशूटर लल्लू ऊर्फ बच्चा यादव (३०, रा. सिद्धार्र्थनगर, मुलुंड) याला उत्तर प्रदेशातील मुगलसराई

डोंबिवली : बांधकाम व्यावसायिक अमित पाटील यांचा अंगरक्षक विकी शर्मा याच्या हत्येप्रकरणी शार्पशूटर लल्लू ऊर्फ बच्चा यादव (३०, रा. सिद्धार्र्थनगर, मुलुंड) याला उत्तर प्रदेशातील मुगलसराई रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमधून सापळा रचून जेरबंद केले. कल्याण न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.२१ डिसेंबर २०१६ ला दुपारी दुचाकीवरू न आलेल्या मारेकऱ्यांपैकी एकाने अमित पाटील समजून विकीवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले, फौजदार विजय मोरे, पोलीस हवालदार मधुकर घोडसरे, सुरेश राठोड आदींच्या पथकाने नागेश सोनावळे (२९, रा. आंबेडकर रोड, ठाणे), अजय वर्मा (३०, रा. खोपट, ठाणे), मोहम्मद मोहिदिन शेख ऊर्फ मोकम्मद टक्का (४८, रा. मीरा रोड) आणि राजू पाटील ऊर्फ राज हातणकर (४५, रा. ठाणे ) या चौघांना आधीच विविध ठिकाणांहून अटक केली होती. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. यातील टक्का हा लखनभय्या हत्या प्रकरणातील एक आरोपी आहे. राजू हा देखील आबू सालेमचा सहकारी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सध्या हे चारही आरोपी न्यायालयीन कोठडी असून त्यांना तळोजा येथील कारागृहात ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)