Join us

मनाविरुद्ध लग्न झाल्यामुळे पत्नीची हत्या

By admin | Updated: May 3, 2017 06:26 IST

मनाविरुद्ध घरच्यांनी लग्न लावून दिल्याच्या रागाने पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केली. गोराई परिसरात

मुंबई : मनाविरुद्ध घरच्यांनी लग्न लावून दिल्याच्या रागाने पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केली. गोराई परिसरात काही दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह सापडला होता. ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. आसिफ सिद्दीकी असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. आसिफ उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. त्याचे ६ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशच्या बाराबाकी परिसरात राहणाऱ्या तबरीनसोबत विवाह झाला. मात्र, त्याला हे लग्न मंजूर नव्हते. त्याच रागात तो तिला घेऊन मुंबईत आला. एमएचबी परिसरात राहणाऱ्या सिद्दीकीने तबरीनचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर, तिचा मृतदेह गोराई डेपोच्या झाडाझुडपात टाकून तो पसार झाला. १० एप्रिलला तबरीनचा मृतदेह पोलिसांना सापडला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सिंधुदुर्ग परिसरात पोलीस या महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेत होते. तेव्हा बाराबाकी परिसरातून तिची ओळख पटली. पतीसोबत तबरीन मुंबईला आली. मात्र, तेव्हापासून दोघेही गायब होते. त्यावरून असिफवरील त्यांचा संशय बळावला आणि त्यांनी उत्तर परदेशातून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. (प्रतिनिधी)