Join us
Daily Top 2Weekly Top 5

दारु पिऊन त्रास देणाऱ्या पतीला पत्नीने भोसकले

By admin | Updated: June 1, 2017 05:30 IST

दारुच्या नशेत पतीकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून पत्नीने पतीला चाकूने भोसकल्याची घटना मंगळवारी मानखुर्द येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: दारुच्या नशेत पतीकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून पत्नीने पतीला चाकूने भोसकल्याची घटना मंगळवारी मानखुर्द येथे घडली. याबाबत मानखुर्द पोलिसांनी पत्नीवर गुन्हा दाखल करुन तिला अटक केली आहे, तर पतीवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मनाखुर्दच्या सतीनगर परिसरातील करबला चाळीत सद्दाम शेख (२६) हा पत्नीसह राहतो. त्याला अनेक वर्षांपासून दारु पिण्याचे व्यसन आहे. त्यामुळे दारुच्या नशेत घरी आल्यानंतर तो रोज पत्नीला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु असल्याने सद्दामची पत्नी पतीच्या वागण्याने वैतागली होती. मंगळवारी सायंकाळी देखील तो नेहमीप्रमाणे दारु पिऊन घरी आल्यानंतर त्याने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने घरातील चाकू घेऊन सद्दामच्या पोटात घुसवला. त्यानंतर स्वत:च शेजाऱ्याच्या मदतीने त्याला सायन रुग्णालयात दाखल केले. मानखुर्द पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करत पत्नीला अटक केली आहे.  मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच मुलाने आईचा खून के ल्याची घटना घडली, आता पत्नीनेच पतीला चाकू ने भोसकले अशा प्रकारे कौटुंबिक वाद टोकाचे होऊन गुन्हे घडत आहेत. हे गंभीर आहे.