Join us

अभ्युदयनगरमध्ये पुनर्विकासासंदर्भात अफवा-टाटाचा दावा

By admin | Updated: March 29, 2017 06:13 IST

अभ्युदयनगर, काळाचौकी येथील सर्वांत मोठ्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत आॅर्नेट हाउसिंग प्रा.लि. कंपनीतर्फे चुकीच्या अफवा

मुंबई : अभ्युदयनगर, काळाचौकी येथील सर्वांत मोठ्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत आॅर्नेट हाउसिंग प्रा.लि. कंपनीतर्फे चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा टाटा हाउसिंगने केला आहे. टाटा हाउसिंगने आॅर्नेट हाउसिंग प्रा.लि. यांनी टाटा हाउसिंग कंपनीच्या ब्रँडच्या नावाचा उपयोग  करू नये यासंदर्भात न्यायालयात दावा दाखल केला होता. न्या. एस.जे. काथावाला यांनी गेल्या २३ डिसेंबर रोजी आणि न्यायमूर्ती जी.एस. पटेल यांनी गेल्या ९ जानेवारी रोजी निर्णय दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अभ्युदयनगर प्रकल्पात टाटा हाउसिंग आणि आॅर्नेटमधील करार आहे, असे आॅर्नेटने म्हणणे चुकीचे आहे, असे टाटा हाउसिंगतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)