भाईंदर : भाईंदरमध्ये एका नवविवाहित तरु णाने आपल्याच पत्नीचे अश्लील चित्रण करून ते अश्लील साईटवर अपलोड केल्याची तक्रार पीडित महिलेने केल्यानंतर तिच्या पतीला नवघर पोलिसांनी अटक केली आहे.नर्मदा नगरमध्ये राहणारा आशिष गुप्त (२५) याचा २०१३मध्ये प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर आशिषने तिच्याबरोबर झालेल्या शारीरिक संबंधाचे चित्रण करून ठेवले होते. काही दिवसांतच दोघांचे खटके उडू लागले. त्यामुळे ती वसईच्या माणिकपूर येथे आपल्या नातेवाईकाकडे राहण्यास गेली, चिडलेल्या आशिषने तिला बदनाम करण्यासाठी हे चित्रण माणिकपूरमधील एका सायबर कॅफेमधून अश्लील साईटवर अपलोड केले. पीडित महिलेच्या भावाच्या मित्राने ते बघितल्यावर त्याने तिच्या भावाला सांगितल्यावर त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
पत्नीचे अश्लील व्हिडिओ अपलोड करणा-या पतीस अटक
By admin | Updated: June 7, 2014 03:52 IST