Join us  

मतदारांचा ओढा नोटाकडे का? ‘नोटा’आधी काय होते? जाणून घ्या सविस्तर

By संतोष आंधळे | Published: April 18, 2024 8:42 AM

काही मतदारांना त्याच्या निवडणूक क्षेत्रात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार आवडत नाहीत.

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मतदान पत्रिकेवर देण्यात आलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये कोणीही संसदेवर पाठविण्यायोग्य नाही, असे जर मतदारांना वाटत असेल तर त्यांनी वरीलपैकी कोणीही नाही (नन ऑफ द अबोव्ह - नोटा) या पर्यायासमोरील बटन दाबावे, असा एक पर्याय २०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून देण्यात आला. गेल्या दहा वर्षांत झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत अनेक मतदारांनी हा पर्याय वापरला. त्याचे प्रमाण आताशा वाढत चालले आहे.

‘नोटा’चा वापर काही प्रमाणात वाढतोय. काही मतदारांना त्याच्या निवडणूक क्षेत्रात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार आवडत नाहीत. त्यामुळे ते नोटा पर्यायाचा वापर करतात. मात्र माझ्या मते त्यांनी नोटाचा वापर करण्याऐवजी त्यांनी कोणत्या तरी उमेदवाराला मत दिले पाहिजे; कारण त्यांनी ‘नोटा’ला मत दिले तरी कुणी तरी उमेदवार निवडून येणारच आहे. त्यापेक्षा त्यांनी आहे त्या उमेदवारांपैकी कुणा एकाला मत दिले पाहिजे. - डॉ. मृदुल निळे, प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ 

  • मुंबई शहरातील मतदान -  २४,९०,७२८
  • २०१९ लोकसभा निवडणुकीत नोटाला मतदान - २४,५३०

विधानसभा मतदारसंघ किती? मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण-मध्य हे दोन लोकसभा मतदारसंघ येत असून १० विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. 

‘नोटा’आधी काय होते? मतदान यंत्रांमध्ये नोटा पर्याय लागू करण्यापूर्वी, ज्या मतदारांना सर्व उमेदवार नाकारायचे होते, त्यांना मतदान केंद्रावर फॉर्म ४९(ओ) भरण्याचा पर्याय होता. तथापि, ४९ ( ओ ) दाखल करण्याच्या या प्रक्रियेमुळे मतदाराच्या गोपनीयतेशी तडजोड होत होती, या अशा फॉर्ममुळे मतदाराची ओळख ही गुप्त राहत नसे. 

मुंबई शहरात लोकसभा २०१९, विधानसभानिहाय ‘नोटा’ मतदानविधानसभा    एकूण मतदार    एकूण वैध मते    नोटाधारावी      २४६९२२     ११७४१२    १४८६ सायन कोळीवाडा     २५४९१०    १३४८७३    २२४०वडाळा    २०३२२१    ११८६०५    २५८३माहीम     २३४७५२    १३३२३४    ३१५०वरळी     २६८३०३    १३६०३१    ३०७३शिवडी     २७४१९७    १४०४६९    ३८५५भायखळा     २३९९४८    १३०९८१    १८७४मलबार हिल     २६०६५७    १४३२४०    ३००२मुंबादेवी     २४२६१०    ११५९७६    १२२७कुलाबा     २६५२०८    ११७७३३    २०४०एकूण     २४९०७२८    १२८८५५४    २४५३०

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४