Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत डबलडेकर ट्रेन का नाही ?

By admin | Updated: September 3, 2015 01:17 IST

मुंबईत डबलडेकर ट्रेन का नाही, असा सवाल करीत उच्च न्यायालयाने याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले़ महिला अत्याचाराविरोधात न्यायलायात

मुंबई: मुंबईत डबलडेकर ट्रेन का नाही, असा सवाल करीत उच्च न्यायालयाने याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले़ महिला अत्याचाराविरोधात न्यायलायात काही याचिका दाखल आहेत़ त्यावरील सुनावणीत रेल्वेमध्ये होणाऱ्या गर्दीचे नियोजन करणे किती कठीण आहे, याचा अंदाज घेण्यासाठी न्यायाधीशांनी रेल्वेची सफर करावी, अशी विनंती रेल्वेच्या वकिलाने केली़ त्यावर न्यायालय म्हणाले, की मुंबईत डबल डेकर ट्रेन सुरू करण्याच्या प्रस्तावाचे पुढे काय झाले़ याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती न्यायालयाला दिली जाईल, असे रेल्वेच्या वकिलाने स्पष्ट केले़