Join us

लायसन्स रद्द का करू नये?

By admin | Updated: August 7, 2015 01:33 IST

ईस्टर्न फ्री-वे अपघातातील आरोपी जान्हवी गडकरला आरटीओकडून गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तुमचे लायसन्स रद्द का

मुंबई : ईस्टर्न फ्री-वे अपघातातील आरोपी जान्हवी गडकरला आरटीओकडून गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तुमचे लायसन्स रद्द का करू नये? अशी विचारणा या नोटिसीच्या माध्यमातून केल्याचे आल्याचे आरटीओ अधिकारी बी.आय. अजरी यांनी सांगितले. दारूच्या नशेत असलेल्या जान्हवी गडकरच्या आॅडी कारने एका टॅक्सीला धडक दिली. यात दोन प्रवासी ठार तर चार जण जखमी झाले. या प्रकरणी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. या अपघाताचे स्वरूप गंभीर असल्याने लायसन्स रद्द करण्याविषयी वडाळा आरटीओकडून कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र गडकर ही अटकेत असल्याने त्या नोटीसला उत्तर मिळाले नाही. त्यामुळे जामीन मिळताच गुरुवारी वडाळा आरटीओकडून दुसऱ्यांदा कारणे दाखवा नोटीस बजावली. (प्रतिनिधी)