Join us  

महिला प्रवाशांची खंत कोण ऐकेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 4:28 AM

महिला प्रवाशांना सकाळी-सायंकाळच्यावेळी गर्दीतून प्रवास करावा लागतो. यामुळे काहीवेळा अपघाती मृत्यू होतो. रेल्वेकडून कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलली जात नसल्याने मृत्यूचे प्रमाण कमी होत नाही.

मुंबई : महिला प्रवाशांना सकाळी-सायंकाळच्यावेळी गर्दीतून प्रवास करावा लागतो. यामुळे काहीवेळा अपघाती मृत्यू होतो. रेल्वेकडून कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलली जात नसल्याने मृत्यूचे प्रमाण कमी होत नाही. रेल्वेचे अनेक प्रकल्प बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहेत़ या संदर्भात महिला संघटनानी रेल्वे प्रशासनाला निवेदने पाठविले़ एकाही निवेदनाला उत्तर मिळाले नाही, असा महाराष्ट्र महिला रेल्वे प्रवासी महासंघ संघटनेचा आरोप आहे.मुंबई उपनगरीय मध्य रेल्वे मार्गावरील महिला प्रवाशांचा प्रवास असुरक्षित आहे. रेल्वे प्रवासात दररोज ९ ते १५ जणांचा मृत्यू होतो. महिला प्रवाशांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्प कधी पूर्ण होतील, याबाबत रेल्वे प्रशासनाला प्रश्न विचारण्यात आले आहेत. यावर रेल्वे प्रशासनाकडून उत्तर आले नाहीत. महाराष्ट्र महिला रेल्वे प्रवासी महासंघ या संघटनेने अनेक निवदने पाठविली आहेत. याला उत्तर देण्यात आले नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.मध्य रेल्वे प्रशासनाने सल्लागार समितीमध्ये आम्हाला फक्त नामधारी सदस्य नेमले आहे. वर्ष लोटूनही एकही बैठक झाली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला महिल्यांच्या समस्यांवर गंभीर नाही. महिला महासंघाच्या मागण्याकडेही रेल्वेने दुर्लक्ष केले आहे, असा आरोप महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी महासंघाने केला आहे.दररोज महिलांची संख्या वाढत असून कसारा, कर्जत या रेल्वे मार्गावरून एकही महिला विशेष लोकल सोडण्यात येत नाही. कल्याण - कसारा ३ आणि ४ मार्गिका प्रकल्प प्रलंबित आहे. प्रवाशांना येथून मुंबई गाठण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. सकाळ-सायंकाळच्या सुमारास प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा नसते. काही प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो. आता उपोषणाशिवाय रेल्वे प्रशासनाला जाग येणार नाही, असे मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या सदस्या (झेडआरयूसीसी) वंदना सोनावणे यांनी केला आहे.मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक प्रवाशांच्या बैठका घेत असतात. कोणत्याही समिती सदस्यांची भेट मध्य रेल्वे प्रशासनाकडून घेतली जाते, असे मध्य रेल्वेच्या अधिकाºयाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :मुंबई लोकलमहिला