प्राची सोनवणे ल्ल नवी मुंबईमहानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या उमेदवारांचे ‘लोकमत’च्या माध्यमातून वयोगटांनुसार सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये अनुभवी उमेदवारांना सर्वाधिक संधी देण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्या खालोखाल तरुण उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे. या सर्वेक्षणात पक्षनिहाय वर्गवारी करण्यात आली असून, २१ ते ३५ असा पहिला गट, ३६ ते ५९ असा दुसरा गट आणि ६० पासून पुढे तिसरा गट अशी विभागणी केली आहे. प्रत्येक पक्षामधील या तिन्ही गटांत एकूण किती सदस्य आहेत, या आकडेवारीचाही अभ्यास करण्यात आला. राजकीय क्षेत्राचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त आहे. यापूर्वी निवडणूक लढविलेल्या उमेदवारांच्या कुटुंबातील तरुणांनाही संधी देण्यात आली आहे. यामध्ये नेत्यांनी आपल्या मुलांना, जोडीदाराला तसेच जवळच्या नातेवाइकांना संधी दिली आहे. पक्षनिहाय वर्गवारी पाहता शिवसेनेमध्ये २१ ते २५ वयोगटातील २३ तरुण उमेदवार, ३६ ते ५९ या गटातील ४२ अनुभवी उमेदवार आणि ६० पासून पुढील ३ उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षातील पहिल्या गटात २५ तरुण उमेदवार, दुसऱ्या गटात ३१ अनुभवी उमेदवार आहेत आणि तिसऱ्या गटात १ उमेदवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पहिल्या गटात ३० उमेदवार, दुसऱ्या गटात ५५ तर तिसऱ्या गटात २ उमेदवार आहेत. काँग्रेस पक्षातील पहिल्या गटात २५ उमेदवार आहेत. दुसऱ्या गटामध्ये ५५ उमेदवार आहेत आणि तिसऱ्या गटात तीन उमेदवार आहेत. इतर पक्षात १०६ तरुण उमेदवार, १४२ अनुभवी उमेदवार आहेत आणि ५ वयस्कर उमेदवार आहेत. मतदारांच्या उमेदवारांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी राजकीय पक्षांनीही कसरत केली. अनुभवाबरोबरीनेच नव्या विचारांच्या तरुणांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.अनुभवी उमेदवारांची संख्या जास्त आहे. याआधी राजकारणातले उन्हाळे - पावसाळे अनुभवल्याने या क्षेत्रातील दांडगा अनुभव या उमेदवारांना आहे. उद्याचे भविष्य असलेल्या तरुण उमेदवारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहेत. वयोगटानुसार अभ्यास केला तर तरुण मंडळीही राजकारणाकडे वळते आहे, असे दिसून आले. आपल्या घरातील नेतृत्वाच्या आधारावर अनेक तरुणांनी या निवडणुकीत आपले पहिले वहिले पाऊल या क्षेत्रात टाकले आहे. च्प्रत्येक पक्षात अनुभवी उमेदवारांची संख्या जास्त आहे.च्सर्वच राजकीय पक्षांनी तरुणांना संधी दिली आहे.च्वयस्कर उमेदवारही तेवढ्याच ताकदीने निवडणूक लढणार आहे.च्आपल्या पक्षाकडे तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारीही तरुणांनाच दिली आहे.च्राजकीय वारसा जपण्यासाठी तरुणांनीही या क्षेत्रात पाऊल टाकले आहे.शिवसेना वयोगटसंख्या१.२१ ते ३५२३२.३५ ते ५९४२३.६० आणि त्याहून अधिक३भाजपा१. २१ ते ३५२५२.३५ ते ५९३१३.६० आणि त्याहून अधिक१राष्ट्रवादी कॉँग्रेस१. २१ ते ३५३०२.३५ ते ५९७५३.६० आणि त्याहून अधिक२कॉँग्रेस१. २१ ते ३५२५२.३५ ते ५९५५३.६० आणि त्याहून अधिक३अपक्ष१. २१ ते ३५१०६२.३५ ते ५९१४२३.६० आणि त्याहून अधिक५
विजय कोणाचा... नव्या विचारांचा की अनुभवाचा?
By admin | Updated: April 17, 2015 22:40 IST