Join us

जो मारो घागरा घुमयो!

By admin | Updated: September 18, 2014 23:19 IST

नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवी मुंबईतील प्रमुख बाजारपेठांसह छोटे - मोठे बाजारही नवरात्रीच्या साहित्यांनी सजले आहेत.

पूनम गुरव - नवी मुंबई
नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवी मुंबईतील प्रमुख बाजारपेठांसह छोटे - मोठे बाजारही नवरात्रीच्या साहित्यांनी सजले आहेत.  नवरात्रोत्सव म्हटला की गरबा- दांडिया हा आलाच. त्यासाठी घागरा - चोली, चनिया चोली, कुर्ते आदी पोषाख खरेदीसाठी तरूणाईची गर्दी बाजारात दिसत आहे.
शहरातील विविध बाजारपेठेत सध्या नवरात्रीची लगबग सुरू आहे. नवरात्रोत्सवासाठी  बाजारपेठेत नवनवीन  ड्रेसेस चोखाळताना महिलावर्ग दिसत आहे. यावर्षी जरीकाम केलेले, रंगीबेरंगी, कुंदन घुंगरू लावलेले घागरे मुलींच्या अधिक पसंतीला पडत आहेत.  दुकानदारांनी महिला आणि तरूण वर्गाला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळय़ा प्रकारच्या रंगीबेरंगी घागरा-चोली विक्रीला ठेवल्या आहेत. अनेक दुकानामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून घागरा आणि चनिया चोली आवडीनुसार खास तयार करून घेण्याच्या ऑर्डरही दिल्या जात आहेत.
 सुरत,  गुजरात व राजस्थान येथील काही विक्रेते नवरात्रोत्सवासाठी नवी मुंबईमध्ये घागरा, चनिया -  चोली विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडील चनिया चोलीवर जरीचे वर्क असून त्यामुळे यांना पारंपरिक लूक मिळत आहे. घागरा चोली पेहराव फक्त नवरात्रीच्या काळात बाजारात येत असला तरी त्याचा सगळा माल हा गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येतो. या कार्यक्रमानिमित्ताने वेशभूषा स्पर्धाही आयोजित केल्या जात असल्याने या काळात या पेहरावाला खूपच मागणी असल्याचे तृप्ती ठक्कर यांनी 
सांगितले. 
 
नवा ट्रेंड; घागरा 5क्क् रुपयांपासून 25 हजारांर्पयत
1यावर्षी  घागरा चोलीपेक्षा जरीकाम केलेले कुंदन, घुंगरू लावलेले, मणी, डायमंड, शिंपले, कवडी, काचा यापासून तयार केलेल्या घाग:याला अधिक मागणी आहे. या घाग:याची किंमत 5क्क्  रूपयांपासून 25 हजार  रूपयांपर्यत आहे, तर साधा काचा लावलेली घागरा चोली 4क्क्  रूपयांपासून पुढे  उपलब्ध आहे. 
2लहान मुलींची घागरा चोली 15क् ते 1क्क्क् रूपयांर्पयत आहे. दांडिया खेळताना तरूण मुले थोडे हटके दिसण्यासाठी वेगवेगळी फॅशन करतात. याकरिता बाजारपेठेत विविध वर्क केलेले जॅकेट्स उपलब्ध आहेत. 
 
बालगोपाळांसाठी खास पेहराव
च्बाजारात यावर्षी लहान मुलांसाठी खास पेहराव उपलब्ध आहेत. o्रीकृष्णाचा पेहराव असलेला धोती लेंगा, त्याला साजेसा पायजमा आणि डोक्याला शोभेची पट्टी अशा स्वरूपात असलेला हा पेहराव सर्वाचे लक्ष वेधून घेत असून याची किंमत 3क्क् ते  1क्क्क् रूपयांर्पयत आहे.