Join us  

सुशांतचे टि्वटर अकाऊंट हँडल करतेय कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 2:57 AM

मुंबई पोलिसांना टि्वट करत संबंधित व्यक्तीवर कायद्याचा बडगा उगरावा, अशी मागणी चाहत्यांकडून होत आहे.

गौरी टेंबकर - कलगुटकर मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) याचे टिष्ट्वटर अकाऊंट कोणीतरी हँडल करत असल्याचा संशय चाहत्यांनी व्यक्त केला आहे.त्याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी जोर धरत आहे. मुंबई पोलिसांना टि्वट करत संबंधित व्यक्तीवर कायद्याचा बडगा उगरावा, अशी मागणी चाहत्यांकडून होत आहे.मुंबई पोलिसांना सुशांतच्या एका चाहतीने यासंदर्भात व्हिडीओ टिष्ट्वट केला आहे. सुशांतची फॉलोअर्स लिस्ट ६,७१० इतकी होती. मात्र त्यातील दोन फॉलोअर्स कमी झाल्याचे तिने म्हटले आहे. तसेच संग्रामसिंग रेस्टलर या हँडलवरून सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र ती पोस्टही डिलिट करण्यात आली. त्यामुळे पुन्हा या हँडलरने ‘माझे टिष्ट्वट कोण आणि का डिलिट करत आहे?, आम्ही निव्वळ सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही’, अशा आशयाचा मजकूर त्यात लिहिल्याचे चाहतीचे म्हणणे आहे. त्याचे स्क्रीनशॉटदेखील तिने व्हिडीओद्वारे शेअर केले आहेत.तर अन्य एका फॉलोअरने सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या बेडरुमचे व्हिडीओ कोणीतरी व्हायरल करत असून त्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.गळफासाचे डेमोनस्ट्रेशन !सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही तरुण गळफासाचा डेमोनस्ट्रेशन व्हिडीओ तयार करुन त्याच्या मानेवर असलेल्या जखमांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याने याबाबत मानसोपचार तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.>श्वास गुदमरल्यानेचझाला मृत्यू; शवविच्छेदन अहवालातील माहितीशवविच्छेदन अहवालातसुशांतचा मृत्यू श्वास गुदमरून झाला असून त्यावेळी त्याने कोणत्याही प्रकारचा स्ट्रगल केल्याचे निदर्शनास आलेले नाही, जो गळा दाबून हत्या करताना केला जातो.मात्र त्याच्या जाण्याच्या धक्क्यातून न सावरलेले त्याचे चाहते मात्र यावर अद्याप विश्वास ठेवायला तयार नाहीत. ही आत्महत्या नसून त्याची हत्याच झाल्याचा दावा अजूनही त्याचे फॅन्स करत असून ‘जस्टीस फॉर सुशांत’ या हॅशटॅगमार्फत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी होत आहे.>‘त्या’ व्हिडीओची चौकशी करूसुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या बेडरूमचा व्हिडीओ व्हायरल केला जात असला तरी अद्याप आमच्याकडे अशी काही माहिती आलेली नाही. मात्र असा काही प्रकार असेल तर आम्ही चौकशी करत योग्य कारवाई करू- अभिषेक त्रिमुखे,पोलीस उपायुक्त, परिमंडळ ९

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत