Join us
Daily Top 2Weekly Top 5

...त्यांना कोण विचारात घेणार?

By admin | Updated: May 26, 2015 22:51 IST

महापालिकेत २७ गांवाचा समावेश करण्यात येत असून त्यासाठी ७००० कोटी निधी मागण्यात आला आहे. हा निधी राज्य शासनाला देता येणे शक्य आहे का?

अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवलीमहापालिकेत २७ गांवाचा समावेश करण्यात येत असून त्यासाठी ७००० कोटी निधी मागण्यात आला आहे. हा निधी राज्य शासनाला देता येणे शक्य आहे का? तसेच हा निधी येणार तो केवळ या गावांच्या विकासासाठी वापरण्यात येणार का? तसेच राज्य शासनाने या २७ गावांच्या नागरिकांना ज्या प्रमाणे विचारात घेतले त्याप्रमाणत कल्याण-डोंबिवलीकरांना यामध्ये सामावून का घेतले नाही? त्या नागरिकांवर हा निर्णय लादला आहे. अशी टिका मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष राजू पाटील यांनी केली.शासन- महापालिका आणि सत्ताधारी यांच्यावर टिकेची झोड घेत त्यांनी नागरिकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या, अन्यथा आगामी निवडणूकीत त्याचा निकाल लागेलच असा टोलाही त्यांनी लगावला. शासन जर कोट्यवधींचा निधी या महापालिकेला देत असेल तर ह्यापेक्षा कमी खर्चात २७ गावातील १८ गावे तसेच कल्याण तहसिलमधील गावे ज्यात शिरढोण, बाळे, वडवली, खोणी, अंतर्ली आणि डोंबिवली त्यामध्ये नेतीवली व कचोरे चा डोंबिवलीकडील भाग अशी स्वतंत्र महानगरपालिका होऊ शकते. जी भौगोलिक दृष्ट्या व नियोजनाच्या दृष्ट्या ‘स्मार्ट सिटी’ म्हणून उदयास येवू शकते. त्याचा कारभार डोंबिवलीतील सध्याच्या प्रशासकीय इमारतीतून काही दिवसांसाठी कारभार केला जाऊ शकतो.२७ गावांमध्ये अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पाहता मानपाडाच्या पुढे देसाई खाडीपर्यंत 'जास्त' अनधिकृत बांधकामे नाहीत. राहिलेली गोळवली, आजदे, नांदीवली, सागाव, सोनारपाडा व भोपर तसेच डोंबिवलीतील कोपर, मोठागाव, नवापाडा, कुंभारखानपाडा, आयरे येथे एकदाच क्लस्टर सारखी योजना राबवून एक सुनियोजीत स्मार्ट सिटी उभारता येईल. या संदर्भात पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे देखिल त्यांची भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडणार असल्याचेही पाटील म्हणाले.गावठाणांना काही प्रमाणात सवलत द्यावी .तळोजा डंपिंग ग्राउंड जवळ असल्याने कच-याचा प्रश्न सहज निकाली निघेल. नवी मुंबईच्या धर्तीवर एमएमआरडीए सारखे नियोजनप्राधिकरण आणावे ,जेणेकरून अनधिकृत बांधकामांवर लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप कमी राहील . सध्या २७ गावांमध्ये एमएमआरडीएच आहे.प्रस्तावित मोठागाव मानकोली पूल सुद्धा एमएमआरडीए तर्फे करण्याचा प्रस्ताव आहे. उरलेली ९ गावे आशेळे, माणेरे,भाल ,वसार व इतर जी २७ गांवाची नगरपालिका झाली तर त्यात समाविष्ट होण्यास राजी नाहीत त्यांची कल्याण ही नवी महानगरपालिका बनवावी असेही ते म्हणाले.