Join us

पांढऱ्या वाघाचा मृत्यू

By admin | Updated: June 8, 2015 02:32 IST

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘सिद्धार्थ’ या पांढऱ्या वाघाचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयातून ‘सिद्धार्थ’ला उद्यानात आणण्यात आले होते.

मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘सिद्धार्थ’ या पांढऱ्या वाघाचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयातून ‘सिद्धार्थ’ला उद्यानात आणण्यात आले होते. आता या पांढऱ्या वाघाच्या मृत्यूमुळे सध्या येथे दोन पांढरे वाघ, पाच बंगाली वाघ शिल्लक आहेत. त्यापैकी एका पांढऱ्या वाघाला जिभेचा कर्करोग झाला असून, त्यावर उपचार सुरू आहेत.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डॉ. संजीव पिंजारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी वृद्धापकाळामुळे या वाघाचा नैसर्गिकरीत्या मृत्यू झाला. तो २० वर्षांचा होता. साधारणपणे १८ ते २० वर्षे ही वाघांची वयोमर्यादा असते. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. कर्करोगग्रस्त रिबेक्का या वाघिणीवर उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)