Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुरणपोळी, रंग आणि धम्माल...

By admin | Updated: March 5, 2015 00:59 IST

होळी आणि रंगपंचमी हे दोन्ही दिवस म्हणजे मजा, मस्ती आणि पुरणपोळीचे. बुरा ना मानो होली है... म्हणत अबालवृद्धांपासून सगळेच होळीचा आनंद मनसोक्त लुटताना दिसतात.

होळी आणि रंगपंचमी हे दोन्ही दिवस म्हणजे मजा, मस्ती आणि पुरणपोळीचे. बुरा ना मानो होली है... म्हणत अबालवृद्धांपासून सगळेच होळीचा आनंद मनसोक्त लुटताना दिसतात. या सेलीब्रेशनमध्ये कलाकार मंडळीही मागे नाहीत. लोकांना घटकाभर करमणूक मिळण्यासाठी झटणारे हे कलाकार होळीचा आनंद या वर्षी आपआपल्या परीने पण मनसोक्त लुटणार तर आहेतच पण वाईट प्रवृत्तींचा, स्वाइन फ्लूचा नाश होवो यासाठी मागणेही मागणार आहेत.पुरणपोळीचा बेतहोळी म्हटल्यावर पुरणपोळी हेच समीकरण आहे. मी रंगपंचमी खेळते, मात्र इकोफ्रेंडली रंगांनीच खेळण्यावर भर असतो. गेली अनेक वर्षे मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीतील कलाकारांसोबत रंगपंचमी खेळते, त्यामुळे यंदाही तिथे सेलीब्रेशनसाठी जाणार आहे. शिवाय, होळी म्हटली की बॉलीवूड आणि मराठीतील या सणाची गाजलेली गाणी ऐकायलाही मला आवडतात- सोनिया परचुरे, नृत्यदिग्दर्शिका नकारात्मकतेची होळी!होळी म्हणजे प्रथेप्रमाणे होळीत वाईट, नकारात्मक गोष्टींचा नाश करायचा. आयुष्यात नकारात्मक गोष्टींचे प्रमाण जास्त असू नये. या होळीच्या रात्री मी माझ्या आयुष्यातल्या नकारात्मक गोष्टींची होळी करणार आहे. बोंब मारण्याची पद्धत आहे. एकाच दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी नकारात्मकतेच्या विरोधात बोंब मारणार आहे. यामुळे सकारात्मक सुरुवात होण्यास मदत होते. मला रंग खेळायला आवडतात. मराठी कलाकारांची रंगपंचमी असते, तिथे जाईन. ‘लोकमत’च्या वाचकांना ‘हॅपी होळी’, जपून रंगपंचमी खेळा.- सुयश टिळक, अभिनेतामुंबईत सध्या स्वाइन फ्लू फोफावत आहे. एखाद्या साथीच्या आजारामुळे अनेकांचा बळी जातो, हे अत्यंत वाईट आहे. होळीच्या दिवशी सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो, त्याचप्रमाणे या वेळी स्वाइन फ्लूचा नाश व्हावा, अशी होळीला मी प्रार्थना करणार आहे. याचबरोबरीने कापूर आणि वेलची होळीत घातल्याने स्वाइन फ्लूला आळा बसेल असा मेसेज फिरत आहे. यामुळे होळीत कापूर आणि वेलची घालणार आहे. होळी म्हणजे पुरणपोळी पाहिजेच. मी स्वत: पुरणपोळी आणि कटाची आमटी करणार आहे. घरी आणि मग मराठी कलाकारांबरोबर रंगपंचमी खेळणार आहे. - अदिती सारंगधर, अभिनेत्री मुलांबरोबर खेळणार रंगपंचमी होळीला मी नेहमीच घरी असतो. त्याच दिवशी मी माझ्या मुलांबरोबर रंगपंचमी पण खेळतो. माझ्या छोट्या मुलाला रंगपंचमी खेळायला खूप आवडते. लहान मुलांबरोबर रंग खेळायला खूप मजा येते. आमच्या सोसायटीतील सगळी लहान मुले एकत्र येऊन रंगपंचमी खेळतात. त्यांच्याबरोबर मी रंग खेळतो. मराठी कलाकारांची रंगपंचमी असेल तिथेही मी जातो. म्हणजे एकूण दोन दिवस मी रंगपंचमी खेळत असतो, तेव्हा शूटिंग मी ठेवत नाही. ‘लोकमत’च्या वाचकांना होळीच्या शुभेच्छा!- रवी जाधव, दिग्दर्शकवाईट प्रवृत्तींची होळीसमाजात अनेक वाईट प्रवृत्ती फोफावत आहेत, त्यामुळे त्यांचा नायनाट झाला पाहिजे, अशी प्रार्थना होळी देवतेकडे करणार आहे. शिवाय, शूटिंगला काहीसा ब्रेक देत घरातल्यांसोबत रंगपंचमी साजरी करणार आहे. गेली कित्येक वर्षे वेगवेगळ्या रंगांनी रंगलेले चेहरे पाहण्यात मज्जा वाटते, तो आनंद निराळाच असतो.- नीलेश साबळे, सूत्रसंचालकपुरणपोळी आणि रंग...होळी आणि रंगपंचमी हे दोन्ही दिवस म्हणजे मजा, मस्ती आणि पुरणपोळीचे. होळीच्या दिवशी घरी केलेली पुरणपोळी खाण्याची मजा काही औरच असते. मुंबईत होळीच्या दुसऱ्या दिवशीच रंगपंचमी खेळतात. या दिवशी मराठी कलाकारांची रंगपंचमी असते. तिथे जाऊन मी रंगपंचमी खेळणार आहे आणि पाच दिवसांनी नाशिकला जाऊन मी होळी खेळणार आहे. मुंबईबाहेर पाच दिवसांनी धुळवड खेळली जाते. नाशिकला घरी जाऊन कुटुंबीयांबरोबर परत होळी साजरी करणार आहे. मुख्य म्हणजे मला घरची पुरणपोळी खायला मिळणार आहे. या वर्षी सर्वांनी रंग खेळा, पण जपून. - नम्रता गायकवाड, अभिनेत्रीआम्ही मालिकेच्या सेटवर होळीपूर्वीच रंगपंचमीचा सीन शूट केला आहे. त्यामुळे खूप धम्माल, मजा-मस्ती करत रंगपंचमी साजरी केली आहे, आता मला दोनदा रंगांशी खेळायला मिळणार, याची उत्सुकता आहे. सेटवर तर आम्ही खूपच दंगा केला. आमच्या गँगने मिळून सेटवरच्या सगळ्यांनाच रंग लावले. रंगपंचमीच्या दिवशी ‘फुल्ल आॅन’ रंगांनी खेळणार असून घरच्यांसोबतही काही वेळ घालविणार आहे.- प्राजक्ता माळी, अभिनेत्रीघरच्यांबरोबर सेलीब्रेशनगेल्या काही वर्षांत शूटिंगमुळे घरच्यांबरोबर होळी, रंगपंचमी साजरी करता आली नाही. पण या वर्षी शूटिंग न करता दोन दिवस घरच्यांबरोबर, मित्रांबरोबर होळी साजरी करणार. होळीच्या दिवशी आमच्या सोसायटीत खूप मजा असते. पुन्हा एकदा ही सगळी मजा अनुभवता येणार आहे. माझे बाबा बाहेरगावी असतात, या वेळी ते घरी आहेत. सोसायटीत अर्ध्या तासासाठी रेनडान्स ठेवलेला आहे, यानंतर नैसर्गिक रंगाने रंगपंचमी खेळणार आहोत.- संग्राम साळवी, अभिनेताआईच्या हातची पुरणपोळी होळी आणि आईच्या हातची पुरणपोळी हे समीकरणच आहे. माझी आई अप्रतिम पुरणपोळी करते. तिच्या हातची पुरणपोळी खायला खूप आवडते. होळी आणि रंगपंचमीसाठी खास असे काही प्लॅनिंग केलेले नाही. होळीच्या दिवशी शूटिंग आहे. यानंतर जमले तर कॉलनीत रंगपंचमी खेळायला जाईन. मराठी कलाकारांची रंगपंचमीतही कदाचित जाईन. अजून कोणताच प्लॅन निश्चित नसला तरी होळी मात्र नक्की खेळेन. - सुरुची अडारकर, अभिनेत्री